स्नेहालय संस्था अहिल्यानगर

असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज संघटनेचा स्नेहालय सद्भावना सायकल यात्रेस 30 सायकलींचा सहयोग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – येत्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्नेहालय सद्भावना सायकल यात्रेसाठी आमी संघटना (असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज AAMI) अहिल्यानगर, यांनी 30 सायकलींचा भरीव सहयोग दिला. 

 

स्नेहालय तर्फे करण्यात आलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत एमआयडीसीतील सर्व कंपन्यांच्या आमी संघटनेने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.आज संघटनेच्या नवीन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या सर्व 30 सायकली स्नेहालय प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आल्या. 

 

यावेळी स्नेहालयचे हनीफ शेख यांनी यात्रेची उद्दिष्टे व माहिती उपस्थितांना दिली. युवानिर्माण प्रकल्पाचे समन्वयक विकास सुतार, सीमा जुनी, अरूपा गौडा, पंकज चौहान, संगीता सानप, संदीप क्षीरसागर, शंकर राठोड मिरेन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आमी संघटनेचे अध्यक्ष श्री जयद्रथ काकाळ व संस्थापक सदस्य मिलिंद कुलकर्णी यांच्या आवाहनातून हा उपक्रम साकार झाला. कार्यक्रमात सायकल देणाऱ्या सदस्यांचा स्नेहालय तर्फे कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अध्यक्ष खाकाळ यांनी स्नेहालय कार्यकर्त्यांचा शाल, नारळ देऊन गौरव केला.

 

यावेळी बोलताना मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, “स्नेहालय व आमी संघटनेचे ऋणानुबंध हे कायम मदतीच्या रूपात दिसून आले आहेत. भविष्यातही संघटना स्नेहालयास भक्कम पाठिंबा देत राहील.”कार्यक्रमात जयद्रथ काकाळ, राजेंद्र शुक्रे, राजेंद्र जग्गी, सुनील मनोत, संजय बंदिष्टी, राजेंद्र कटारिया, सतीश गवळी, सागर निंबाळकर, निनाद टिपगुडे, सुभाष गुगळे, सचिन पाठक यांसह आमी संघटनेचे अनेक सदस्य सहभागी झाले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!