
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव ग्रामस्थांचे प्रेरणास्थान शिवभक्त ह.भ.प. दिगंबर महाराज काशीकर ब्रह्मचारी यांचे शनिवार (दि.२३) निधन झाले.दिगंबर महाराज काशीकर हे महान शिवभक्त ह.भ.प. अरविंद महाराज ब्रह्मचारी यांचे बंधू होते.त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली.(दि.२४ जळगाव येथील श्री महादेव मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने दिवंगत महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी गावातील ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेशचे संचालक संपतराव चौधरी,अण्णासाहेब चौधरी, उपसरपंच दिलीपराव चौधरी, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज ओळेकर, एम.टी. चौधरी, अशोक चौधरी,यांच्यासह जळगाव परिसरातील सर्व महादेव भक्त उपस्थित होते.

दिवंगत शिवभक्त दिगंबर महाराज काशीकर यांचा साधेपणा आणि शिवभक्ती हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी जीवनभर महादेवभक्ती, परमार्थ आणि सद्गुणी जीवनाचे महत्त्व रुजवले. राहाता तालुक्यातील जळगावशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता ते आल्याने महादेव मंदिर परिसर नेहमीच अध्यात्मिक उर्जेने भारलेला वाटायचा.त्यांच्या शिकवणुकीतून अनेक भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले आणि जीवनात सद्गुण पाळण्याची प्रेरणा मिळाली त्यांची स्मृती गावकऱ्यांच्या हृदयात कायम जिवंत राहतील.असे शिव भक्तांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.




