
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे आणि मनमाड- शाहपूर मार्गे अकोला आणि बेलापूर मार्गे नेवासा – परळी वैद्यनाथ दरम्यान नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी सर्वेक्षण कार्य पूर्ण करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नास उत्तर देताना सांगितले.
यावेळी खासदार वाकचौरे यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे आणि मनमाड- शाहपूर मार्गे अकोला आणि बेलापूर मार्गे नेवासा-परळी वैद्यनाथ दरम्यान रेल्वे मार्ग कधीपर्यंत टाकण्याचा प्रस्ताव आहे आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीचे तपशील काय आहेत? अशी विचारणा केली असता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी १) नाशिक साईनगर शिर्डी नवीन डबल लाईन ८२ किमी २) साईनगर शिर्डी पुणतांबा दुहेरी लाईन १७ किमी,३) पुंणताबा अहिल्यानगर दुहेरी लाईन ७७ किमी व अहिल्यानगर पुणे नवी दुहेरी लाईन टाकणेसाठी सर्वेक्षण पूर्ण झालेले असून परियोजना अहवाल ( डीपीआर ) तयार करणेत येत असल्याची माहिती देऊन डीपीआर तयार झाल्यानंतर राज्य सरकार यांचेसह नीती आयोग, अर्थ मंत्रालय व विविध खात्यांची आवश्यक मंजुरी असते असे सांगून पुणे नाशिक दरम्यान संगमनेर अकोले मार्गे रेल्वे कनेक्टविटी प्रदान करणेसाठी महाराष्ट्र सरकार व रेल्वे मंत्रालय यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलेची माहिती दिली.
त्यात सदर मार्ग हा नारायणगाव मार्गे जात होता तथापि सदर मार्ग हा प्रकल्प अहवालात राष्ट्रीय रेडीओ खगोल भौतिकशास्त्र केंद्र पुणे यांनी जीएमआरटी विमानतळावरून जात असल्याने विपरीत परिणाम होईल असे स्पष्ट केलेने नारायणगाव मार्गे हा पर्याय स्वीकार्य नव्हता असे उत्तरात नमूद केले .बेलापूर ( श्रीरामपूर) हे अहिल्यानगर मार्गावर रेल्वे स्थानक असून रेल्वे संपर्क अधिक सुधारण्यासाठी अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ नवी लाईन २५० कि. मी. अहिल्यानगर बेलापूर दुहेरी लाईन ६७ कि मी चे काम मंजूर करण्यात आलेले असून शहापूर मुंबई मनमाड आसनगाव कनेक्टविटी अधिक सुधारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेकामी मनमाड इगतपुरी तिसरी व चौथी लाईन १२४ कि. मी. इगतपुरी कसारा चौथी व पाचवी लाईन १६ कि. मी. कसारा आसनगाव चौथी लाईन ३५ कि. मी. चे डीपीआर चे काम करण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनि वैष्णव यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या तारांकित प्रश्नास उत्तर देताना सांगितले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रेल्वे प्रश्नी लोकसभेत आवाज उठविल्याने प्रवाशामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे . याबाबत पुणे झोनल रेल्वे सदस्य राहुल मुथा,प्रवाशी संघटना व विभागीय रेल्वे समिती सदस्य रणजीत श्रीगोड यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आभार मानले.




