
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – शहापूर घोटी विशाखापट्टणम राज्यमार्ग क्र 50 अकोले संगमनेर श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई मार्गे विशाखापट्टणम या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाची परवानगी देऊन या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्याची आग्रही मागणी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पावसाळी अधिवेशनात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी सोबत होते
वरील महामार्ग पाठारी भागातून जात असल्याने अवजड वाहतूक करणारे ट्रक कंटेनर तसेच साखर कारखानदारीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते तसेच हा राज्यमार्ग शिर्डी शनिशिंगणापूर देवगड नांदेड माहूर तिरुपती बालाजी सारख्या तीर्थक्षेत्रांना जोडतो त्यामुळे खाजगी वाहनांची तसेच भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते हा राजमार्ग ज्या भागातून जातो तो भाग औद्योगिक व कृषी क्षेत्राशी निगडित असल्याने या क्षेत्राशी निगडित असलेल्या कच्च्या मालांची वाहतुकी मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यामुळे सध्याचा रस्ता हा अपुरा पडत आहे या अपुऱ्या रस्त्यामुळे दररोज अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत तसेच अनेकांना अपंगत्व आलेले आहे नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हा रस्ता प्रमुख राज्य मार्ग असल्याने या रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण होणे गरजेचे आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे वरील सर्व परिस्थिती पाहता या मार्गाला तातडीने चौपदरीकरण करण्याची मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार वाकचौरे यांनी केली यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे
शहापूर -घोटी-विशाखापट्टणम राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गासाठी लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले आहे बेलापूर परळी रेल्वे मार्ग व वरील राज्यमार्ग हे शिर्डी मतदार संघातील वैभवात भर पाडणारे आहे.
– भाऊसाहेब वाकचौरे खासदार शिर्डी




