प्रवरा शिक्षण संस्था

राज्याच्या क्रीडा क्षेत्राला प्रवरेने दिशा दिली  – राजेंद्र कोतकर

जिल्हास्तरीय ज्युनिअर मुले व मुली मैदानी स्पर्धा 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – राज्याच्या क्रीडा क्षेत्राला प्रवरेने दिशा दिली आहे. ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये प्रवरेचे खेळाडू कायमच अव्वल स्थानावर राहिले आहेत. विद्यार्थ्यांनी मैदानावर यावे शालेय स्पर्धेत सहभागी होऊन खेळातूनही चांगले करिअर करावे असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा मैदानी स्पर्धेचे उपाध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले. 

 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या शत्तकोत्तर जयंतीनिमित्त ॲथलेटिक्स ॲम्युचर्स जिल्हा असोसिएशन अहिल्यानगर आणि प्रवरा स्पोर्टस अकॅडमी आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी आयोजित जिल्हास्तरीय ज्युनिअर मुले व मुली मैदानी स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी कोतकर बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.ए. पवार, डॉ शांताराम चौधरी, दिनेश भालेराव, रमेश वाघमारे, संदीप हारदे डॉ. उत्तमराव अनाप यांचे प्रा.तुवर पाटील यांच्यासह जिल्हाभरातून आलेले विद्यार्थी आणि त्यांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. 

 

यावेळी विद्यार्थ्यांची कोतकर म्हणाले आजचा विद्यार्थी हा मैदानापेक्षा मोबाईलवर जास्त आहे. विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातूनही चांगले करिअर करता येते. आज खेळाचे महत्व वाढावे या उद्देशाने अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत त्याचा फायदा घेत आपण पुढे जावे असे त सांगून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अतिशय चांगले असे काम क्रीडा क्षेत्रात होत आहे या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा अतिशय सुंदर रित्या पार पडत असतात. प्रवरा स्पर्धा प्रवरा स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात प्रवरेच्या माध्यमातून आणि जिल्ह्यातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील या प्रयत्नाशील आहेत. प्रवरेने क्रीडा क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले.  

 

यावेळी बोलतांना डॉ.आर.ए.पवार म्हणाले विखे पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक स्पर्धा या मैदानावरती झाल्या आहेत. प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच खेळालाही विशेष महत्त्व दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी प्रत्येक महाविद्यालयांमध्ये खेळासाठी विविध सेवा सुविधा दिल्या आहेत यामुळे प्रवराचे विद्यार्थी हे राज्य आणि देश पातळीवरती पोहोचले आहे. आई-वडिलांनी मुलांची गुणवत्ता बघतानाच त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातही करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. पालक शिक्षक एकत्र येऊन प्रवरेत काम होत असल्यामुळे प्रवरेचा विद्यार्थी हा खेळातही पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाला जिल्हास्तरीय ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल क्रीडा संचालक डॉ. उत्तमराव अनाप यांचाही सन्मान मान्यवरांनी यावेळी केला. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून ६५० खेळाडू सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील गागरे यांनी तर आभार प्रा. तुवर पाटील यांनी मानले. 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!