
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर –दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. अरुण मांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी शाखा, ‘वारसा’ दिवाळी अंक आणि स्नेहालय संचलित ‘रेडिओ नगर ९०.४ एफएम’च्या वतीने कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कथा मराठी भाषेत सुमारे एक ते दोन हजार शब्दांपर्यंत, स्वलिखीत आणि अप्रकाशित असावी. नाव, पत्त्यासह आपली कथा १५ सप्टेंबरपर्यंत रेडिओ नगर ९०.४, आडकर संकुल, लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर या पत्त्यावर पाठवावी.
पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीस दिले जाईल, शिवाय या कथा ‘वारसा’ दिवाळी अंकात प्रकाशित केल्या जातील आणि ‘रेडिओ नगर’वर त्यांचे अभिवाचन केले जाईल, या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे अशी माहिती ‘वारसा’चे संपादक जयंत येलूलकर व ‘रेडिओ नगर’चे स्टेशन हेड संदीप क्षीरसागर यांनी दिली.




