
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – श्रीरामपूर पोलीस अधीक्षक कार्यालयात राजेंद्र कृष्णराव गोडगे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राजेंद्र गोडगे यांनी कर्तव्यदक्षता, शिस्तप्रियता आणि सेवाभावाच्या जोरावर कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली असून,या पदोन्नतीमुळे त्यांच्या कुटुंबाचा आणि समाजाचा अभिमान द्विगुणित झाला आहे.
नवनियुक्त उपनिरीक्षक राजेंद्र गोडगे हे श्री.गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक विष्णुपंत शंकर शेळके यांचे मेहुणे असून, त्यांच्या या यशामुळे गोडगे व शेळके या दोन्ही कुटुंबांचा अभिमान उंचावला आहे. परिसरात सर्वत्र त्यांच्या कार्यतत्परतेची आणि पदोन्नतीची अभिमानाने चर्चा होत आहे.




