प्रवरा शिक्षण संस्था

लोणीच्या विखे पाटील महाविद्यालयातील प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या पाच विद्यार्थ्यांची शासकिय सेवेत निवड 

मंत्री विखे पाटील यांच्यामुळे शासकीय नोकरीची स्वप्नपूर्ती विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील पाच विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवले असल्याची माहीती उपप्राचार्य डाॅ.आर.ए.पवार यांनी दिली.

 

ग्रामीण विद्यार्थी शिक्षणातून पुढे जावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हे सुरू संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच नोकरीची संधी आणि स्वयंरोजगार त्याचबरोबर शासकीय नियम शासकीय नोकऱ्यांची माहिती मिळावी म्हणून मंत्री विखे पाटील यांनी प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र ही सुरू केली आहेत. केंद्रातील लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील केतकी सर्जेराव विखे हिची सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन मध्ये ज्युनिअर टेक्निकल एक्झिक्युटीव्ह या पदावर, किरण संजय सांगळे आणि ज्ञानदिप याची एस आर पी एफ गट क्रमांक ११ महाराष्ट्र पोलीस मध्ये तर मारुती लहामगे आणि वीरेश नळे यांची महसूल सेवक महाराष्ट्र राज्य म्हणून निवड झाली आहे 

  

मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून शिर्डी,राहाता कोल्हार आश्वी आणि लोणी येथे संस्थेने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि प्रवरा अभ्यासिका सुरू केल्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक आणि विविध सेवा सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. मोफत संदर्भ पुस्तकांची सुविधा मुलाखतीचे तंत्र या विषयावरती सविस्तर माहिती तज्ञाच्या माध्यमातून या केंद्रातून दिली जाते.संस्थेच्या माध्यमातून विविध महाविद्यालयामध्ये प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि पोलिस भरती केंद्र कार्यरत आहे.यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे आज पर्यंत या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध विद्यार्थी हे शासकीय आणि निम शासकीय सेवेबरोबरचं पोलिस आणि सैन्य दलात रुजू होत आहेत.

 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे शिक्षण संचालक डॉ प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, आश्वी कॉलेजचे कॅम्पस संचालक डाॅ. महेश खर्डे, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. आर.ए. पवार, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर, राहाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप,डाॅ.शैलेश कवडे-देशमुख यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

  

 मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि उपलब्ध सेवेमुळे शहरात जाण्याची गरज पडली नाही. माझ्या यशाचे श्रेय प्रवरेला जाते. सामान्य जनतेची अनेक मुले हे शासकीय आणि निम शासकीय सेवेत केवळ प्रवरा स्पर्धा परीक्षांमुळे पोहचत आहे. पोलीस भरतीच्या माध्यमातून देश सेवा करावी हे माझे स्वप्न होते ते मंत्री विखे पाटील यांनी सुरू केलेल्या या केंद्रामुळे पुर्ण झाले असे किरण सांगळे यांनी सांगितले.   

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!