
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कृषि शास्त्र संस्थेअंतर्गत असणाऱ्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कृषीदूत म्हणून तांभेरे येथे नुकताच ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव उपक्रमातून प्रवरेच्या विद्यार्थ्यांची शाश्वत शेतीकडे प्रेरणादायी वाटचचालीचा अनुभव घेतला.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, कृषि संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विद्यार्थ्यांनी शाश्वत शेतीकडे दिशादर्शक वाटचाल या ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमातून केली आहे. कृषी शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असावा. नोकरी रोजगार त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी तो मार्गदर्शक व्हावा या दृष्टीने प्रवरा कृषी शास्त्र संस्था ही नेहमीच प्रयत्नशील असते आणि यामुळेच या विद्यार्थ्यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांकडून ज्ञान घेत असतानाच आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले हे मार्गदर्शन करताना उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्र, मशागत पद्धत, शेतीचे यांत्रिकीकरण, उत्पादित मालावर प्रक्रिया, बाजारपेठ, पुरक व्यवसाय,शासकिय योजना यांची माहीती शेतकऱ्यांना दिली.
या उपक्रमानुसार मार्गदर्शक प्रा. शुभम मुसमाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर योग्य असे मार्गदर्शन करून त्यांना शेतीतील विविध तांत्रिक बाबींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवून दिले. त्यामध्ये सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, गांडूळखत निर्मिती, चारा उत्पादन नियोजन, दुग्ध व्यवसाय, बायोगॅस उत्पादन इत्यादी बाबींचा समावेश होता.कृषीदूत प्रथमेश बोराटे, राजशेखर ढूस, आराध्य केदार, तनय आहेर, तेजस ठेटे आणि रोहित गजरे आदी विद्यार्थ्यांनी तांभेरे गावात वास्तव्य करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर उपाय सुचवले.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायत तांभरेचे सरपंच श्री. सागर मुसमाडे, उपसरपंच सौ. मनीषा कांबळे, ग्रामसेवक राजेंद्र ओहळ, तसेच ग्रामस्थ संदीप मुसमाडे, घनश्याम मुसमाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कृषिदुतांना प्राचार्य डॉ. आशिष क्षीरसागर, प्रा. संतोष वर्पे, प्रा. शुभम मुसमाडे यांचे मार्गदर्शन लाभले




