
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – चितळी (ता. राहाता) येथील ग. भा. भिमाबाई प्रभाकर चौधरी (वय ९०) यांचे अल्पशा आजारानंतर नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चितळी परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून, त्या चितळीतील प्रसिद्ध वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र प्रभाकर चौधरी, प्रकाश प्रभाकर चौधरी आणि सुनील प्रभाकर चौधरी यांच्या मातोश्री होत्या. तसेच, चितळीतील उद्योजक व व्यावसायिक सागर चौधरी, जाहिराती विभागाचे सचिन चौधरी यांच्या त्या आजी होत्या.
भिमाबाई चौधरी या जुन्या पिढीतील जाणकार, अनुभवसंपन्न आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून चितळी गावात परिचित होत्या. त्यांचा स्वभाव शांत, संयमी आणि प्रेमळ होता. त्यांच्या जाण्याने गावाने एक आदर्श ज्येष्ठ नागरिक गमावला आहे.गावातील अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.




