Uncategorized

प्रवरेत शिक्षणांसोबत संस्कृती आणि संस्कारक्षम शिक्षण मिळते – डॉ. बसवराज शिवपुजे

प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण सोहळा संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – प्रवरेत शिक्षणांसोबत संस्कृती आणि संस्कारक्षम शिक्षण मिळते यामुळे प्रवरेचा विद्यार्थी हा सर्व संपन्न आहे. दर्जेदार शिक्षणांमुळे येथील विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहचला आहे.मुलांना आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करा असे प्रतिपादन श्रीरामपूरचे पोलिस उपअधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी केले.

 

लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी डाॅ.शिवपुजे यांनी केले.

 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रतिनिधी बॅजेस व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. सर्व वीस नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींची शाळेतील नेताजी, शिवाजी,तानाजी आणि सरदार पटेल सदनांच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदी पदस्थापना करण्यात आली. नेताजी सदन – वेदांत जगताप, शिवाजी सदन – आशिष वसावे, तानाजी सदन – चेतन रहासे, सरदार पटेल सदन – महेंद्र पाडवी इ विद्यार्थ्यांची सिनिअर प्रिफेक्टपदी नियुक्ती करण्यात आली. ज्युनिअर प्रिफेक्ट कु वैभवी आहेर हिच्यासह सर्व नवनियुक्त प्रतिनिधींनी शपथ ग्रहण केली.

 

विद्यार्थी प्रतिनिधी पदस्थापना सोहळ्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम. एस. जगधने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका सौ. सिमा क्षिरसागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा संचालक रमेश दळे यांनी केले.  

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!