Uncategorized

प्रवरेच्या कृषीच्या विद्यार्थ्यांनी ग्रो बॅग मध्ये पिकविला भाजीपाला

ग्रो बॅग शेती शहरी भागात अत्यंत लोकप्रिय ठरली आहे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्थेअंतर्गत असणाऱ्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रोबॅगमध्ये दोडका, कारली, घोसाळे आणि भोपळा या पिकांचे योग्य व्यवस्थापन करून भरघोस उत्पादन घेतले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.आशिष क्षीरसागर यांनी दिली आहे. 

ग्रो बॅग शेती ही शहरी भागात अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर ठरत आहे. ग्रोबॅगमध्ये योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करुन ताजा आणि सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन होऊ शकते.सदर प्रकल्प यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची दूरदृष्टी व प्रेरणा कार्यरत ठरली. ‘शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञाना पुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित असावे म्हणजे विद्यार्थी सैद्धांतिक नव्हे तर व्यवहारिक शिक्षण घेतील’ या उद्देशाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या प्रकल्पअंतर्गत केवळ विज्ञानाचेच नव्हे तर व्यवस्थापन, जबाबदारी आणि संघटनेचेही धडे शिकत आहे.

सदर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. आशिष क्षीरसागर, प्रा. अश्विनी घाडगे आणि प्रा. प्रेरणा अभंग व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालयाने शिक्षणासोबतच शेतकऱ्यांचे मार्गदर्शक व्हावे या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हे पुस्तके ज्ञानाबरोबरच कृषी महाविद्यालयाने सुरू केले आहे.

 

या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हे विद्यार्थी मार्गदर्शन करतात. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी नक्षत्र परसबाग या माध्यमातून कोविड काळात सेंद्रिय परसबागेची मोठी जनजागृती महिला बचत गटाच्या माध्यमातून केली आजही अनेक महिला परसबागेच्या माध्यमातून चांगले उत्पादन घेत आहेत. आता ग्रो बॅगच्या माध्यमातून त्यांना ही बॅग जवळपास दोन ते तीन वर्ष वापरता येते.हे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने आणि हे तंत्रज्ञान कृषी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्याने परसबाग करणाऱ्यांची मोठी सोय या निमित्ताने झाली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृषी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मार्केटिंग, ग्रेडिंग, पॅकिंग याचेही ज्ञान संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!