कोपरगावगुन्हेगारीप्रशासकीयलोणी

शिर्डी उपविभागातील पोलीस स्टेशन हद्दीत २०२४ वर्षात दुचाकी व चारचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये साठ टक्के घट जनतेतून समाधान शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांची यशस्वी कामगिरी विना नंबर प्लेटच्या २४० वाहनांवर कारवाई करून १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल कारवाईमूळे बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दाणाणले!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

प्रतिनिधी – अक्षय काळे 
कोपरगाव – अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस उपअधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी केलेल्या कारवाईत शिर्डी उपविभागातील पोलीस स्टेशन हद्दीत २०२४ वर्षात दुचाकी व चारचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये साठ टक्के घट झाली असून शहरात विना नंबर प्लेटच्या २४० वाहनांवर कारवाई करून विक्रमी असा १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे यामुळे बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दानाणले असून त्यांना मोठी चपराक बसली आहे. 
शिर्डी उपविभागातील कोपरगाव शहर,कोपरगाव तालुका,शिर्डी, राहाता व लोणी पोलीस स्टेशन हद्दीत दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात दुचाकी व चार चाकी वाहनांच्या चोरीच्या घटना घडल्या असून गतवर्षी २०२४ मध्ये या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांत तब्बल ६० टक्के घट झाली असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हंटले आहे की,शिर्डी उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत  मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याला आळा घालण्याकरिता विविध ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून वारंवार दुचाकी चोरीचे गुन्हे जेथे घडत आहेत त्या मोक्याच्या व गर्दीचे  ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत.दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये प्रतिबंध होण्याकरिता पोलिसांनी पेट्रोलिंग चालू केली आहे अचानकपणे वर्दळीच्या इतरही ठिकाणी सातत्याने नाकाबंदीचे आयोजन करून त्यात विना नंबरची मोटरसायकल चालकांवर कारवाई करण्यात आली विना नंबर प्लेटच्या २४० वाहनांवर कारवाई करून विक्रमी असा १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जाहिरात

“शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपिंची कसून चौकशी..!
“शहरात होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपिंचा सखोल व बारकाईने तपास करण्यात येत आहे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या इतरही आरोपींची माहिती घेऊन त्यांच्याकडून देखील बहुतेक चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे.
“पोलिसांनी केली धडक कारवाई..!
या कारवाईमुळे मोटरसायकल चोरणारे विना नंबरचे दुचाकी व चारचाकी वापरण्यावर निश्चितच चपराक बसणार आहे शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी  सर्व पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमूळे या चोरीच्या गुन्हाच्या घटनांमध्ये जवळ-जवळ ६०टक्के घट झाली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिस प्रशासनाचे कौतुक केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!