
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन बियाणांच्या जाती बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २९ मे ते १२ जून २५ या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान ही देशव्यापी मोहीम सुरू झाली. या मोहिमेचा शुभारंभ राहाता तालुक्यातील दहेगाव आणि रांजणगाव या गावांमधून झाला. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, केंद्र, आणि राज्य पातळीवरील संस्था, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव ,अकोले, संगमनेर आणि पारनेर या तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. अशी माहीती केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख यांनी दिली.
या मोहिमेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॅब टू लँड, शेतीचे उत्पादन दुप्पट करणे, शेतकऱ्यांमध्ये पाणी आणि खत वापर याविषयी जनजागृती, खरीप हंगामातील पिकांचे सुधारित तंत्रज्ञान, नवीन बियाणांच्या जाती, शासकीय योजना, मृदा आरोग्य कार्ड चा प्रभावी वापर आणि खरीप पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, पिक विमा योजना शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर शेती क्षेत्रात ए.आय. तंञ,फळबाग लागड तंत्रज्ञान शेती पुरक व्यवसाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन या अभियानातून गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा अहिल्यानगरचे पालकमंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे,संचालक डाॅ.उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ , कृषी विद्यापीठतील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी, प्रयोगशिल शेतकरी गाव पातळीवर शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती थेट बांधावर जाऊन देणार आहे या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये विविध तंत्रज्ञानाची माहिती देण्याबरोबरच शेतकऱ्यांना खरीप पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान लागवड पद्धत, बीज प्रक्रिया, जैविक खते आणि जैविक औषधांचा वापर त्याचबरोबर पाणीबचत आणि फळबाग तंत्रज्ञानाबरोबरच विविध शेती पूरक व्यवसायाची माहिती दिली जाणार आहे.या अभियांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानात प्रचार प्रसार करण्यासाठी ही देशव्यापी मोहिम सुरू केली आहे.प्रयोग शाळांमध्ये केलेले नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन कार्य निश्चित वेळेत शेतकऱ्यांपर्यंत शेतात उपलब्ध करून देण्यावर या अभियानातून भर दिला आहे
दहेगांव आणि रांजनगांव येथील शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड , तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे , कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, एन. आय. ए. एम. चे डाॅ. विजय काकडे, डॉ. गोरक्ष वाकचौरे, के. व्ही. के. चे शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे, भरत दवंगे, डॉ. प्रियंका खर्डे, डॉ, विलास घुले, सज्जला लांडगे, डॉ.विठ्ठल विखे, कैलास लोंढे आणि बचत गटातील महिला, शेतकरी उपस्थित होते.
या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित पिके, पशुपालन, मत्स्यपालन, तसेच विविध सरकारी योजना आणि धोरणांची माहिती देणे हा आहे.गावांमध्ये विशेष उपक्रम राबविणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना सुधारित कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ नियोजन, शासकीय योजनांचे फायदे, नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.
