प्रवरा शिक्षण संस्था

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गृहविज्ञान महिला महाविद्यालय व करियर कट्टा यांच्यात सामंजस्य करार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी –लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय आणि राज्य सरकारचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कोल्हापूर येथील माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राशी सामंजस्य करार करण्यात आला,अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनुश्री खैरे यांनी दिली. या करारावर प्राचार्य आणि महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महारष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करीयर कट्टा या उपक्रमअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर विविध कार्यक्रम राबवले जातात.

 

या उपक्रमाचा विस्तार आणि अंमल बजावणी आधिक प्रभावी होण्यासाठी पुणे विभागातील करीयर कट्टा संलग्न महाविद्यालयांची सहविचार सभा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आण्णासाहेब मगर महविद्यालय, हडपसर येथील का र्यक्रमात हा करार झाला.यूजीसी एमएमटीटीसीचे संचालक डॉ. संतोष केंद्रे यांच्या हस्ते या सभेचे उद्घाटन झाले. यावेळी विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. नितीन घोरपडे, अहील्यानानगरचे प्राचार्य प्रवर्तक डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी, जिल्हा समन्वयक डॉ नवनाथ नागरे आदी उपस्थित होते. विद्यार्थी केंद्रित उपक्रमांना गती देण्याच्या या प्रयत्नांबद्दल संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील आणि शिक्षण संचालक डॉ प्रदीप दिघे यांनी अभिनंदन केले. 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!