गुन्हेगारी

मातुलठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ४ आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

कारवाईत एकूण ५४,६००००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपुर – तालुक्यातील मातुलठाण शिवारात गोदावरी नदी पात्रातुन काही इसम ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या सहाय्याने वाळु भरून चोरुन अवैधरित्या वाळु वाहतुक करत असल्याची खात्रीशीर माहीती (दि.८) रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली त्या नुसार एकुण ५४,६०००० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात श्रीरामपूर तालुका पोलिसांना यश आले आहे.

 

 

माहितीच्या आधारे श्रीरामपुर तालुका पोस्टेशन चे प्रभारी परि. पोलीस अधीकारी रॉबिन बन्सल,पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर येथील पोहेकॉ शंकर चौधरी, पोना सचिन धनाड, पोना रामेश्वर वेताळ, पोकों सुनिल दिघे, यांचेसोबत श्रीरामपुर तालुका पो.स्टे. चे पोसई सतिष डौले, पोसई संदिप मुरकुटे, पोहेकॉ प्रशांत रननवरे, पोकॉविनोद कुदनर असे पथक तयार करुन कारवाई करणेकामी मिळालेल्या माहीतीच्या नमुद ठिकाणी रवाना झाले.

 

 

(दि.८) रोजी मध्यरात्रीचे सुमारास मातुलठाण शिवार, ता. श्रीरामपुर येथे गोदावरी नदी पात्रात छापा घालणेकामी पथकासह पोहचुन थांबले असताना पहाटे ३.४५ वा. चे सुमारास मिळालेल्या माहिती प्रमाणे काही इसम हे ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रात उतरुन जेसीबीच्या साहयाने वाळुचा चोरुन उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याचे पोलीस पथकाची खात्री होताच सदर ठीकाणी पंचासमक्ष छापा टाकुन नदीपात्रात एक जेसीबी, आठ ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळु भरलेले, व दोन मोटार सायकली याप्रमाणे वाहने मिळुन आली. सदर वेळी पोलीस पथकाची चाहुल लागल्याने आंधाराचा फायदा घेवुन ट्रॅक्टर व जेसीबी वरील ड्रायव्हर साधने नदीपात्रात सोडुन पळून जाऊ लागताच पोलीस पथकाने त्यातील तीन ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर व एक जेसीबी चालक असे चार जणांना त्याब्यात घेवुन त्यांना पोलीस पथक असल्याचे ओळख सांगुन विश्वसात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नावे आकाश अभिमन्यु ठोंबरे वय-२० रा. पुरणगाव (ता.वैजापुर) अतीश दत्तु रोठे वय-२० वर्ष रा. हिंगोणी (ता.वैजापुर) गणेश कैलास पवार वय-२४ रा. लाखगंगा (ता.वैजापुर) व एक जेसीबी चालक सुमित धर्मराज ठोंबरे वय -१९ रा. पुरणगाव ता. वैजापुर असे असल्याचे सांगीतले. त्यांचेकडे व सदर ठिकाणी मिळुन आलेल्या वाहनांचे वर्णन खालील प्रमाणे-११२/१

 

४ लाख किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर निळया रंगाची ट्रॉली त्यात अंदाजे एक ब्रास वाळु किं. ५ लाख किमतीचा सोनालीका कं. चा ट्रॅक्टर व ट्रॉली त्यात अंदाजे एक ब्रास वाळु भरलेली ५ लाख रुपयेकिमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली त्यात अंदाजे एक ब्रास वाळु असलेले ४ लाख किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली त्यात अंदाजे एक ब्रास वाळु असलेले ४ लाख किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली त्यात अंदाजे एक ब्रास वाळु असलेले ५ लाख रुपये किमतीचा आयशर फाईव्ह स्टार कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली त्यात अंदाजे एक ब्रास वाळु असलेले ५ लाख रुपये किमतीचा DEUTZ-FAHR कं.चा ट्रॅक्टर व ट्रॉली त्यात अंदाजे एक ब्रास वाळु असलेले ३ लाख रुपये किमतीचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली त्यात अंदाजे एक ब्रास वाळु असलेले २ लाख रुपये किमतीचा पिवळया रंगाचा जेसीबी तसेच अंदाजे ६० हजार रुपये किंमतीच्या टीव्हीएस कंपनीच्या दोन मोटार सायकल असा एकुण ५४,६०००० रुपये किंमतिचा मुददेमाल घटनाठिकाणी मिळुन आल्याने पंचनामा करुन वरील वर्णनाची साधने व इसमांना ताब्यात घेवुन श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे आणुन कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

 

पोहेकॉ शंकर संपतराव चौधरी, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर तालुका पोस्टे गु.र.नं. १९९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२),३(५) सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपुर तालुका पो.स्टे. चे पोसई. संदीप मुरकुटे हे करत आहेत.सदरची कारवाई राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपुर,डॉ.बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधीकारी,श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर, श्री. दशरथ चौधरी, पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर तालुका पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली रॉबिन बन्सल,परि.पोलीस अधीक्षक,प्रभारी श्रीरामपूर तालुका पो.स्टे.यांचे उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर नेमणुकीचे पोहेकॉशंकर चौधरी, पोना सचिन धनाड,पोना रामेश्वर वेताळ, पोकॉ सुनिल दिघे, तसेच श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे पोसई सतिष डौले, पोसई संदिप मुरकुटे, पोहेकॉ प्रशांत रननवरे, पोकॉ विनोद कुदनर, होमगार्ड सागर कोळपे, राम मोरे यांनी केली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!