प्रवरा शिक्षण संस्था

सात्रळ महाविद्यालयात फार्मा जॉब रेडीनेस ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

सात्रळ – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या विकासात नेहमीच अग्रेसर राहिली आहे.विद्यार्थ्यांच्या सुप्त कौशल्याधिष्ठीत क्षमतांचा विकास करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात,यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्याचे मनोबल वाढवणे आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हा हेतू असतो.

 

साञळच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल अंतर्गत शोध ॲडव्हान्टेक छत्रपती संभाजीनगर येथे एम. एस्सी केमेस्ट्रीच्या २१ विद्यार्थ्यांनी नुकताच “फार्मा जॉब रेडीनेस ट्रेनिंग प्रोग्राम” यशस्वीरीत्या पूर्ण केला.पारंपरिक अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थी जेव्हा मार्केटमध्ये नोकरीसाठी प्राप्त करतात त्यावेळेस त्याला या ट्रेनिंगचा खूप फायदा होतो. कारण इंडस्ट्रीमध्ये लागणारे सर्व इन्स्ट्रुमेंट हाताळण्याचे कौशल्य या ट्रेनिंगमध्ये शिकविले जाते. तसेच इंटरव्यूची तयारी करून घेतली जाते

 

मॉक इंटरव्यू आयोजित केल्या जातात.त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे एच.आर. बोलवले जातात. आणि म्हणूनच असे ट्रेनिंग केल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही कार्पोरेट क्षेत्रात नोकरी मिळविणे सुलभ होते.सदर ट्रेनिंग प्रोग्राम काकडे योगीराज काकडे , हर्षल वाणी, गौरव पठारे, कासार संकेत कासार, आदित्य शिंदे, आशिष कदम, , प्रमोद नेहे, , किशोर जाधव , दिपक मुसमाडे, ज्ञानेश्वर शिरसागर, गौरव डुक्रे, रचना गागरे , ऋतुजा वाणी, अश्विनी वाणी, निकिता घोरपडे , पल्लवी गागरे , मोनाली व्यवहारे , तृप्ती सिनारे, मयुरी नागरे , महेश सिनारे, आणि आदित्य ताठे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. शोध ॲडव्हान्टेक छत्रपती संभाजीनगर येथील रजनी मुद्कवी आणि मैत्रय मुद्कवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, रसायनशात्र विभागप्रमुख डॉ. अमित वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंटच्या सेलच्या समन्वयक सौ.छाया कार्ले यांनी दिली. 

 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिंनगर, सहकारी प्राध्यापक, सेवक वृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे. 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!