
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव व चौधरी वस्ती शाळा येथे शनिवार (दि.२२) हिंदुस्तान फीड्स यांच्या वतीने श्री.अष्टविनायक दूध संकलन केंद्र जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील १५४ विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्ससह बॅगचे वाटप करण्यात आले.
जळगाव पंचक्रोशीचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली टिफिन बॉक्स व बॅग्स वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी हिंदुस्तान फीड्सचे अधिकारी पी.ए सातपुते,के.आर गायकवाड,एस.पी लांडगे, एम.बी जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने व जि.प शाळेच्या वतीने पहिंदुस्थान फीड्सच्या सर्वच अधिकारी वर्गाचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी उद्योजक महेंद्र चौधरी,साई राम कृषी सेवा केंद्राचे संचालक रवींद्र चौधरी यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून टिफिन बॅग वाटपाचा कार्यक्रम यशस्वी झाला.हिंदुस्तान फिड्सच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे. हिंदुस्तान फीड्स ही सामाजिक बांधिलकी जपणारी एकमेव कंपनी असून. विद्यार्थ्यांना गरजेचे साहित्य वाटप करून हा दिशादर्शक उपक्रम राबवला आहे हिंदुस्तान फीड्सने आपुलकीची भावना जपली आहे टिफिन बॉक्स व टिफिन बॅग्सच्या वाटपााच्या कार्यक्रमाचे आयोजन करून गावात प्रथमच असा उपक्रम राबवला असून हिंदुस्तान फीड्सचे कार्य उल्लेखनीय आहे. कौतुकास्पद उपक्रम आयोजित केला असून अश्याच सामाजिक उपक्रमातुन फीड्स कंपनीने पुढाकार घेवून शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असल्याचे गौरवद्वार जेष्ठ नेते गंगाधर चौधरी, संचालक संपतराव चौधरी यांनी काढले.
याप्रसंगी सार्थक कृषी सेवा केंद्राचे संचालक विजय चौधरी, साई श्रद्धा दूध संकलन केंद्राचे संचालक विजय चौधरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.गोरक्षनाथ चौधरी उपाध्यक्ष शाम चौधरी, माजी अध्यक्ष बाबासाहेब चौधरी, एकनाथ निर्मळ बाळासाहेब चौधरी,मच्छिंद्र चौधरी,बाबासाहेब चौधरी,राजेंद्र चौधरी संदीप चौधरी आप्पासाहेब चौधरी, उद्योजक अमोल देशमुख, यांच्यासह जळगाव पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक व माता-पालक यावेळी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी जळगाव परिसरातील सर्व डेअरी समूह मालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव यांच्या वतीने हिंदुस्तान फीड्स कंपनी जळगाव परिसरातील सर्व डेअरी टीमचे शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने मुख्याध्यापिका संगीता अहिरे यांनी आभार मानले यावेळी शिक्षिका मेगा बागुल,शिक्षक संतोष हेकरे,मारुती खरात,यांचे विशेष सहकार्य लाभले.
