
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील चितळी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर जेष्ठ उपशिक्षक नामदेव शिरसाठ यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. चितळी महाविद्यालयात प्राचार्य पदावर रुजू झाल्याबद्दल सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल देऊळगाव गलांडे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळली आहे.त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या. मार्गदर्शनाखाली नुकतीच पदोउन्नती होवून त्यांच्याकडे चितळी महाविद्यालायाच्या प्राचार्य पदाचा कार्यभार देवून त्यांची बढती करण्यात आली आहेत्यांनी यापूर्वी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या हातोला, कोरडगाव,करजगाव, देऊळगाव गलांडे,अशा नामवंत महाविद्यालयात तब्बल तीस वर्षे प्रदीर्घ सेवा केली आहे.याचबरोबर बी एस .सी बी एड .एम.ए. डी एस एम शाखेतून त्यांनी शिक्षण पुर्ण केले आहे प्राचार्य नामदेव शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुणवान विद्यार्थी आजवर घडवले असून सध्याला त्यांचे अनेक गुणवंत विद्यार्थी डॉक्टर,इंजिनियर्स, वकील अश्या उच्चपदावर कार्यरत आहेत.
प्राचार्यपदी पदोउन्नती व निवडीबद्दल रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, उत्तर विभागीय अध्यक्ष तथा आ.आशुतोष काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे ,प्रमोद तोरणे जळगावचे जेष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेशचे माजी संचालक भाऊसाहेब चौधरी, गणेशचे संचालक संपतराव चौधरी, चितळीचे सरपंच नारायणराव कदम,स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य ज्येष्ठ सदस्य शंकरराव चौधरी, जळगावचे उपसरपंच दिलीपराव चौधरी, दिपकराव वाघ, सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य व उत्तर विभागीय सल्लागार समितीचे निमंत्रित सदस्य भाऊसाहेब मोरे,ॲड.अशोकराव वाघ,नितीन चौधरी, एल.आर गायकवाड, शंकर नाना चौधरी, राजेंद्र चौधरी, दीपक वाघ,विक्रम वाघ पर्यवेक्षक, सुधाकर पिलगर चितळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी स्वागत व यथोचित सन्मान करून अभिनंदन केले आहे.
