महाराष्ट्रशैक्षणिक

डॉन बॉस्को प्राथमिक शाळेत ‘सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श’ विषयावर जनजागृती सत्र

इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता, वैयक्तिक सीमा आणि अस्वस्थ परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – डॉन बॉस्को प्राथमिक विद्यालयातील इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श’ या महत्त्वपूर्ण विषयावर २६ सप्टेंबर रोजी जनजागृतीपर सत्र आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या शरीराची सुरक्षितता, वैयक्तिक सीमा आणि योग्य-अयोग्य स्पर्श याबाबत वयानुरूप माहिती देणे, तसेच अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, हा या सत्राचा मुख्य उद्देश होता.

मनोदय समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून या सत्राचे आयोजन करण्यात आले. मुलांसाठीचे सत्र समुपदेशक सागर भिंगारदिवे यांनी, तर मुलींसाठीचे सत्र समुपदेशक कोमल भापकर यांनी घेतले. सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जामुने यांचे यावेळी सहकार्य लाभले.

सत्रामध्ये विद्यार्थ्यांना शरीराचे महत्त्वाचे व खाजगी भाग, सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श तसेच गोंधळात टाकणारा स्पर्श याबाबत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. अस्वस्थ करणारा स्पर्श झाल्यास ‘नको म्हणा तिथून दूर जा विश्वासू मोठ्या व्यक्तीला सांगा’ हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

आई-वडील, शिक्षक-शिक्षिका, आजी-आजोबा, समुपदेशक किंवा इतर विश्वासू व्यक्तींशी अस्वस्थ करणाऱ्या घटनेबाबत मोकळेपणाने बोलण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. ‘कोणी ऐकले नाही तर पुन्हा सांगा’ तसेच ‘चुकीची घटना घडली तर त्यामध्ये मुलाची चूक नाही’ हा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.

सत्रादरम्यान संवादात्मक पद्धती, उदाहरणे, परिस्थितीवर आधारित प्रश्न आणि विविध कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितता आणि स्वतःच्या शरीराविषयी योग्य माहिती सहज व प्रभावीपणे समजून घेता आली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या शरीराविषयी जागरूकता, सुरक्षिततेची भावना, अस्वस्थ परिस्थिती ओळखण्याची क्षमता आणि विश्वासू व्यक्तीशी संवाद साधण्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!