अहिल्यानगर जिल्हामहाराष्ट्र

डॉ.सुजय विखेंचा आदर, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा मोठेपणा; जिल्हा बँकेच्या बैठकीतील अनोखा क्षण

विखेंनी वाकून केला नमस्कार; थोरातांनी पाठीवर थाप देत घेतला हातात हात

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेर येथे आयोजित बैठकीनंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील अनोखा क्षण पाहायला मिळाला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना वाकून नमस्कार केला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्या पाठीवर थाप देत त्यांचा हात हातात घेतला.माजी खासदार डॉ.सुजय विखे यांचा आदर आणि बाळासाहेब थोरात यांचा मोठेपणा दाखवणारा हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मातब्बर आमदारांनी उपस्थिती दर्शवली होती. विविध पक्षांचे आमदार, माजी आमदार तसेच सहकार क्षेत्रातील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्या पाठीवर थाप देत त्यांचा हात हातात घेतला. दोन्ही नेत्यांमधील हा क्षण उपस्थितांच्या कॅमेऱ्यात कैद झाला.डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी जिल्ह्याला परिचित आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकाच बैठकीत सहभागी होणे आणि त्यानंतर घडलेला हा प्रसंग विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

सोबतच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही हा विषय कुतूहलाचा ठरला आहे. सुजय विखे पाटील यांनी दाखविलेला आदर आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेला आपुलकीचा प्रतिसाद याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर चर्चा सुरू असून, या बैठकीतून पुढील राजकीय समीकरणांबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!