धार्मिक

महंत श्री.नारायणगिरीजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त जळगावात स्वामी काशिकानंद महाराज सरस्वती यांचे कीर्तन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव येथे सालाबादाप्रमाणे सरला बेटाचे ब्रम्हलिन सद्‌गुरु महंत श्री.नारायणगिरीजी महाराज यांची १६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.जळगावात पुण्यतिथी साजरा करण्याचे हे १३ वे वर्ष असून यानिमित्ताने श्री.रोकडोबा महाराज मंदिरात शनिवार (दि.२२) मार्च २०२५ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या प्रसंगी शनिवार (दि.२२) मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री.साईबाबा वारकरी शिक्षण संस्था शिर्डीचे श्री.श्री १००८ महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंद महाराज सरस्वती यांच्या श्रुश्राव्य वाणीतून जळगाव (ता.राहाता) येथील श्री.रोकडोबा महाराज मंदिराच्या प्रांगनात जाहीर हरिकिर्तनाचा सोहळा संपन्न होणार आहे.

 

समस्त भाविक भक्तांना कीर्तन सेवा समाप्त झाल्यानंतर आमटी भाकरीचा महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी भाकरी विठ्ठल-रुख्मिनी मंदिरात पोहच कराव्यात जळगाव पंचक्रोशीतील समस्त भाविकांनी कीर्ततनात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त जळगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ व ग्रामस्थांकडून आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!