धार्मिकनेवासा तालुकासामाजिक

नेवासा फाटा परिसरातील शिवमहाराणा प्रताप चौकात शिवजयंती उत्साहात साजरी

पत्रकार संघटना आणि प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

नेवासा -नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सोहळ्यास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करत त्यांच्याप्रती निष्ठा व्यक्त केली.

 

कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. राजू उंद्रे, विजुभाऊ गाडे,बादल परदेशी, कृष्णा परदेशी, अनिल परदेशी, पत्रकार संभाजी पठाडे, गणपतराव मोरे, सुशील धायजे, पोलीस पाटील आदेश साठे, माधव नन्नवरे, या समस्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी मान्यवरांनी शिवचरित्रावर प्रेरणादायी विचार मांडले आणि शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्श नेतृत्वावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघटना आणि प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.कार्यक्रमाप्रसंगी बाळू लिपाणे, बबलू साळवे,गोटू पडोळ,विकास विटकर,बंडू परदेशी, उत्तम विटकर , आबासाहेब शिरसाट,गणेश झगरे, राहुल बंदिवान, दत्तू हिवरे, बाळू मैदाड, संदीप सोनवणे, शेषराव गव्हाणे, सागर गायकवाड ,पिंटू चव्हाण, सह आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!