
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी – राहुल राजळे
नेवासा – तालुक्यातील नेवासाफाटा येथील कै.दा. ह. घाडगे पाटील विद्यालयात अहिल्यानगर जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या 2025 मध्ये मोठा गट-100 मीटर धावणे या क्रीडाप्रकारात जि. प. प्राथ. शाळा, पानसवाडी केंद्र – मुळा कारखाना ता. नेवासा. जि. अहिल्यानगर येथील विद्यार्थिनी कु. कार्तिकी शिवाजी जाधव हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल तिचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील , शिक्षण विस्तार अधिकारी ( जि. प.) जयश्री कार्ले , नेवासा गटशिक्षणाधिकारी – शिवाजी कराड , विस्तार अधिकारी – रिजवाना शेख , केंद्रप्रमुख फुंदे,शिक्षक नेते सुदर्शन शिंदे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिला या यशासाठी मुख्याध्यापक भाऊसाहेब दहातोंडे,शिक्षक सोमनाथ मुरदारे,ज्ञानदा उबाळे,मीना दुसुंगे,सुमती अकोलकर यांचे मार्गदर्शन लाभले
