नेवासा तालुकासामाजिक

आईवडीलच आपले तिर्थक्षेत्र समजावे डाॅ.वसंत हंकारे यांचे सोनईतील व्याख्यानात प्रतिपादन 

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 प्रतिनिधी राहुल राजळे

 

सोनई -आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा.असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.वसंत हंकारे यांनी सोनई येथील व्याख्यानात व्यक्त केले. 

 

सुजाता इंटरनॅशनल स्कूल मॉर्डन कॉलेज ऑफ बीसीए व पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ” आई-बाप समजून घेताना” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. बुधवारी २९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता झालेल्या कार्यक्रमास विविध विद्यालयातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी,विद्यार्थीनी तसेच अडीच हजारांहून अधिक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.प्रारंभी डॉ.वसंत हंकारे व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने उदघाटन करण्यात आले. मोजक्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

 

यावेळी स्कूलचे मार्गदर्शक बी.एस. सोनवणे,शिवाजीराव सोनवणे आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले,सोनई काॅलेजचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झिने,स्कूलचे संस्थापक किरण सोनवणे, प्राचार्या सौ ज्योती सोनवणे,सचिन पवार, दादासाहेब वैरागर, संजय गर्जे,नानासाहेब घावटे, शिवाजी बाफना, प्रसाद हरकाळे,रोहिणी कराळे, कानिफनाथ कोलते, सविता शिंदे,दत्तात्रय फोफसे, वैभव देवा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यालयातील शिक्षिका उर्मिला मॅडम,रितेश वानखडे,सृष्टी आंधळे, पूर्वा मिसाळ, अनुष्का देशमाने,ऋषिकेश पालवे,सुहानी वैरागर,धनश्री पालवे आदी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बापाविषयी भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

जाहिरात

 

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!