धार्मिकनेवासा तालुकासामाजिक

सोनईत शंकर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सोनई येथे सोमवारी  १०१ कुंडात्मक दत्तयाग सोहळा

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 प्रतिनिधी – राहुल राजळे

 

नेवासा – तालुक्यातील सोनई येथील सदगुरु शंकर महाराज व प्रभू श्री राम भक्त महारुद्र हनुमान यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त श्रीमंत सद्‌गुरु शंकरशेठ महाराज मठ केडगाव,अहिल्यानगर आयोजित एक दिवशीय १०१ कुंडात्मक महादत्तयाग यज्ञ सोहळा परमपूज्य राष्ट्रीय धर्मगुरु अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व दुपारी १२ वाजता व आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शंकर महाराज भक्त परिवार सोनई यांनी दिली आहे.

 

 

सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  मागील बाजूस महा दत्त याग सोहळा होत आहे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.शंकर महाराज भक्त परिवार व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठबळातुन सोनईत सद्गुरू शंकर महाराज यांचे मंदिर साकारले आहे.दत्त याग करण्याचे काही फायदे विषद करतांना सोहळा संयोजकांकडून सांगण्यात आले की या यागामुळे जीवनातील सर्व वाईट शक्ती आणि शत्रूचा नाश होतो,प्रगती आणि समृद्धीशी संबंधित आशीर्वाद प्राप्त होतात,गुरु दोष दूर होतात.आध्यात्मिक गती प्राप्त होत, मोक्षमार्गाची वाटचाल सुलभ होते अशी माहिती देण्यात आली.

 

त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या निमित्ताने आयोजित महादत्त याग सोहळयाचा भाविकांनी लाभ घ्यावा यागासाठी शुभम चांदघोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधावा असे आवाहन भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रम संपन्न झाल्यावर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

 

 

जाहिरात

 

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!