नेवासा तालुकासांस्कृतिकसोनई

सोनईत कलाविष्कारांनी विद्यार्थ्यांनी जिंकले मने किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात  

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

प्रतिनिधी- राहुल राजळे

 

नेवासा -तालुक्यातील सोनई येथील अदिती फाऊंडेशनचे किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. अध्यक्ष स्थानी बिज माता बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे या होत्या. मी जरी शाळा शिकलेली नसले तरी मी या मातीशी नाळ जोडली. उस तोडणी करताना करता स्थापन केलेल्या बचत गटांना ती तयार केलेली रोपे वाटप करत होती. सध्याच्या युगात केमिकल युक्त खताचा होत असलेला वापर हा माझ्या जिव्हारी लागला.

त्याचे दुष्परिणाम मी भोगले. तेव्हा पासून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. यासाठी घरगुती बी तयार करुनच त्यांची लागवड केली पाहिजे तेव्हाच आपण रोगमुक्त होऊ असे बिजमाता राहीबाई पोपरे यांनी बोलताना सांगितले. विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०२३/२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धा तसेच शैक्षणिक स्पर्धा मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित मान्यवर तसेच पालकांचे मन जिंकले. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका किर्ती बंग व सचिन बंग यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. कोळी गितावरील बालचमुंच्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांचे मन जिंकले. 

जाहिरात

यावेळी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, कोपरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिष शेळके, ओम शांती च्या उषा दिदि, गणेश बेल्हेकर, अशोक भुसारी, अश्विनी बानकर, मंगल बानकर, आदी उपस्थित होते प्रस्ताविक हनुमंत फटाले यांनी केले तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका किर्ती बंग यांनी मानले. विद्यालयातील शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!