गुन्हेगारी

 श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या धडाकेबाज कारवाईत ३५.२६ किलो गांजा सदृश अमंली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींच्या श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या कारवाईत तब्बल ७ लाख ६२ हजार ६०० रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद !

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

अहिल्यानगर-जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक,राकेश ओला, श्रीरामपूर तालुक्याचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाई तब्बल ७ लाख ६२ हजार ६०० रुपये किंमतीच्या ३५.२६ किलोग्रॅम गांजासह चारचाकी वाहन कब्जात बाळगणारे दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहे.

 

 

सविस्तर माहिती अशी की,श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध धंदयाबाबत गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, दोन इसम पिकअप वाहन क्रमांक (एम.एच-४३ ए.डी ८२१८) मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ घेवुन मध्यप्रदेशकडून कोपरगाव पुणतांबा मार्गे श्रीरामपूरला येत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली.

 

या पार्श्वभूमीवर पोलीस निरक्षक दशरथ चौधरी यांनी वरीष्ठांना माहिती कळवुन त्यांचे आदेशान्वये श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन चे अधिकारी व अमंलदार तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील अमंलदार यांचे पथक नेमून मिळालेल्या नमुद बातमी प्रमाणे कारवाई करणेकामी आदेशीत केले.

 

नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, सफी /सतिष गोरे, पो.हे.कॉ राजेंद्र लवांडे, पो.हे.कॉ प्रशांत रननवरे, चालक पो.हे.कॉ साजीद पठाण, पो.कॉ श्रीकांत वाबळे, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पोहे.कॉ शंकर चौधरी,पो.ना सचिन धनाड आदींनी कारवाई करणेकामी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे शासकीय वाहनाने गोंडेगाव पुणतांबा रोडने गोंडेगाव येथे दिपक नाना कदम यांचे पत्र्याचे दुकानाजवळ श्रीरामपूर पुणतांबा रोडवर सापळा लावुन थांबले असता (दि.०७/०१/२०२५ ) रोजीचे (०३/१५ वा.) चे सुमारास पुणतांबा कडुन श्रीरामपूर कडे बातमीतील नमुद वर्णनाप्रमाणे चारचाकी पिकअप वाहन येताना दिसले. पथकाची खात्री होताच सदर चारचाकी पिकअप वाहन रस्त्याचे कडेला थांबवून खात्री केली असता तिचा क्रमांक (एम.एच-४३ ए.डी ८२१८ ) दिसला. त्यावरुन सदरची पिकअप बातमीप्रमाणेच व दोन संशयित इसम त्यामध्ये मिळुन आल्याने गाडी बंद करुन चालकास त्याचे ओळखीबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागला. 

 

त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता अन्वर एजाज शहा वय ४२ वर्ष रा. बीफ मार्केट जवळ (वार्ड नं.२) श्रीरामपूर ता.श्रीरामपूर तरुण बाबुलाल पावरा वय ३२ वर्ष रा. जामजिरा ता. शिरपुर जि. धुळे असे असल्याचे सांगितले त्यांची पंचासमक्ष अंगझडती व पिकअप वाहनाची झडती घेतली त्यात इसमाकडे उग्र वासाचा बिया पाला काडया मिश्रीत ओलसर दाबुन भरलेला गांजा सदृश अमंली पदार्थ प्लास्टीकचे आवरणात भरलेला प्रति १०,०००/- रु. किलो प्रमाणे ३५.२६ कि.ग्रॅ. वजनाचा ३,५२,६००/- किंमतीचा मुददेमाल आढळून आला याचबरोबर ४,००,०००/- लाख किमतीची महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप क्रमांक (एम.एच ४३ ए.डी ८२१८) ५ हजार किमतीचे दोन मोबाईल असा एकुण ७ लाख ६२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत करण्यात आला.

 

 

 

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूर तालुका अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे साहेब,श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे,यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी,पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, सफी/सतिष गोरे, पो.हे.कॉ राजेंद्र लवांडे,पो.हे.कॉ प्रशांत रननवरे, चालक पो.हे.कॉ साजीद पठाण, पो.कॉ श्रीकांत वाबळे, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पो.हे.कॉ शंकर चौधरी, पो.हे.कॉ संतोष दरेकर, पो.ना सचिन धनाड, पो.ना.रामेश्वर वेताळ यांनी कारवाई केली आहे 

 

 

पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत अमंली पदार्थ व मोबाईल चारचाकी पिकअप वाहन पंचासमक्ष पंचनामा करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला व पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पो.हे.कॉ प्रशांत जर्नादन रननवरे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १०/२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परीणाम करणारा पदार्थ अधिनियम सन १७,६२,६००९८५ चे कलम २०(B) (२) (C) व २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!