
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर – आळंदी येथे शुक्रवारी (दि.३) जानेवारी रोजी ‘संत कृतज्ञता संवाद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री.क्षेत्र देवगड गुरुदेवदत्त पिठाचे महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री.भास्करगिरीजी महाराज यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतपूजन केले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती भेट देवून आशीर्वाद घेतले.
अलंकापुरी श्री क्षेत्र आळंदी येथे शुक्रवार (दि.३) रोजी ‘संत कृतज्ञता संवाद’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज उर्फ किशोरजी व्यास महाराज यांनी संत कृतज्ञता सोहळयाचे आयोजन केले होते.या मेळाव्यास वारकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ अध्यापक ह.भ.प मारुतीबुवा कु-हेकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध तिर्थक्षेत्राचे संत -महंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सोहळयात राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत राष्ट्रीय संत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शाल,तुळशी हार घालून विठ्ठल रुख्मिणी मातेची मूर्ती भेट संतपूजन करण्यात आले. या प्रसंगी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा देवगड संस्थानच्या वतीने सत्कार केला.
