शैक्षणिकसामाजिकसोनई

नेवासा तालुक्यातील माका महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 प्रतिनिधी- राहुल राजळे

 

नेवासा- तालुक्यातील माका येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली.

सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेल्या अहोरात्र परिश्रमाचे उदाहरणांच्या साहाय्याने मार्मिक शब्दांत मार्गदर्शन केले. तसेच आजच्या पुढीतील मुलींच्या समोर असणारी आव्हाणे व त्या आव्हाणांना कसे सामोरे जावे यासंदर्भात कानमंत्र दिला. तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.भानुदास चोपडे यांनी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या विचारांचा अंगीकार कसा करावा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्ता कोकाटे यांनी केले.सूत्रसंचालन कु.वैष्णवी लोंढे हिने केले. यावेळी आभार प्रा.मंदार कुलकर्णी यांनी मानले.डॉ.अमोल दहातोंडे यांच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रमाचे नियोजनासाठी प्रा. शाहबाज सय्यद,प्रा.अजित हरिश्चंद्रे, प्रा.भक्ती बजांगे व प्रा. प्राजक्ता गायके यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!