क्रीडाशैक्षणिकसामाजिक

बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रतिभा मनोज गायकवाड हिची नेत्रदिपक कामगिरी चितळी ग्रामस्थांकडून भव्य नागरी सत्कार

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

राहाता – चितळी (ता.राहाता) येथील रहिवासी तसेच त्रितीय वर्ष मानसशास्त्र शाखेत शिक्षण घेत असलेली कु.प्रतिभा मनोज गायकवाड हिने गुरुकाशी विद्यापिठ,भटिंडा पंजाब येथील अखिल भारतीय इंटर युनिव्हर्ससिटी बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात कौतुकास्पद कामगिरी बजावली.यायशाबद्दल चितळी ग्रामस्थांकडून शुक्रवारी (ता.३) प्रतिभा गायकवाड हिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर चितळी गावचे लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम,नॅशनल कुस्ती चँम्पियन रविंद्र वाघ ,मोहट देवी मित्र मंडळ ,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सुसरे , यांनी सर्वांनी प्रतिभाचा फेटा बांधुन ,शाल, श्रिफळ देऊन भव्य नागरी सत्कार केला.तसेच तिचे पालक यांचाही सत्कार करण्यात आला चितळी येथील कराटे ग्रुपकडून फोटो हार,शाल देवून सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमास अनिल नळे, कैलास गायकवाड , बापु कापसे, रमेश शेपाळ ,शिवा कदम , विशाल गुळवे,दर्शन गायकवाड ,अजय गिरी,शरद सोणवणे , डाॅ गणेश गायकवाड ,योगेश लांडे,प्रसाद गायकवाड,दिपक तेलोरे,ऊप्पार मामा, राजेंद्र गायकवाड,झडे मामा,बबलु बनसोडे,रमेश गायकवाड , बाबा बनसोडे ,मुसांडे मामा ,संभाजी भोसले,सुनिल शिंगाडे, विजयराव गायकवाड ,शिवाजी गायकवाड ,राजु ठाणगे या सर्वांनी फुल पुष्प देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर चौधरी यांनी केले आभार दत्तात्रय सुसरे यांनी मानले.

 

 

 

यावेळी लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,प्रतिभा हिचे पालक मनोज गायकवाड यांचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा प्रतिभा सारख्या सर्वगुणसंपन्न मुली घडल्या पाहिजे देशपातळीवर आपल्या गावाचे नाव उच्चपातळीवर झळकवले पाहिजे प्रतिभा ही चितळी गावचे भूषण आहे तिने केलेल्या कामगिरीमुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.

 

 

 नॅशनल कुस्ती चँम्पियन पै.रविंद्र वाघ मार्गदर्शन करताना म्हणाले की आजची युवा पिढी शरीर संपत्ती कमवण्यापेक्षा व्यसनाधीन होत असुन त्यांनी प्रतिभा हिचा आदर्श घेवून आपल्या गावाच्यासह जन्मदात्या आई-वडिलांचे नाव लौकीक करावे चितळी सारख्या ग्रामीण भागातील मुलींनी प्रतिभा हिचा आदर्श घ्यावा असे पै.रवींद्र वाघ बोलताना म्हणाले प्रतिभा हिस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!