धार्मिकमहाराष्ट्र

परमार्थ हाच योग्य दिशेने पाऊल टाकण्याचा मार्ग आहे- महंत रामगिरीजी महाराज

जळगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाची महंत रामगिरींच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता; गावाकऱ्यांकडुन 1 लाख 89 हजाराची देणगी;तरुणांसह सप्ताह कमिटीचे कौतुक

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – जीवनात यशस्वी होण्यासाठी दिशा योग्य असणे आणि प्रयत्नही योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.परमार्थात आपण आलो आहोत, त्यासाठी आपल्यात ऊर्जा असणे आवश्यक आहे.संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, हळूहळू मार्ग निघत जातो.जीवनात सतत प्रयत्न करत राहिल्यास एक दिवस असा येतो की आपण योग्य स्थानावर पोहोचतो.यशाकडे वाटचाल करताना प्रत्येकाचा वेग कमी-जास्त असू शकतो, पण योग्य दिशेने टाकलेले पाऊल आपल्याला निश्चितच उचित स्थानावर पोहोचवते.परमार्थ हाच योग्य दिशेने पाऊल टाकण्याचा मार्ग आहे,असे प्रतिपादन गोदाधामचे मठाधीपती महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.

राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र जळगाव येथे (दि.२१) ते (२८ एप्रिल) कालावधीत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने, सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व्यासपीठचालक ह.भ.प.विजय महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह, संत तुकाराम महाराज गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी २८ रोजी सकाळी संत तुकाराम महाराज गाथा मिरवणूक काढण्यात आली.सायंकाळी सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. यावेळी सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान संचालित श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी नूतन मठाचे निर्माणाच्या कामास जळगाव ग्रामस्थांच्या वतीने 1 लाख 89 हजार रुपयाची देणगी देण्यात आली. सप्ताह कालावधीत अन्नदान चहापान तसेच इतर सेवेत योगदान देणाऱ्या दात्यांचा महाराजांनी श्रीफळ देऊन सन्मान केला. महंत रामगिरीजी यांचे सारथी मधुकर महाराज कडलक यांनी जळगाव सप्ताहास 2100 रुपयाची देणगी कबुल केली.यावेळी सप्ताह दरम्यान जळगाव येथील जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समस्त युवकांनी सप्ताहाचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल महंत रामगिरीजींनी गावकऱ्यांचे,तरुणांचे सप्ताह कमिटीचे भरभरून कौतुक केले. मागील पाच वर्षापासून सप्ताहाची गावातील तरुणांनी सप्ताहाची वाटचाल सुरू ठेवलेली आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये युवकांचा वाढता सहभाग कौतुकास्पद आहे.असे गौरवदार महंत रामगिरीजी महाराजांनी काढले.तसेच सन 2011 मध्ये चितळी येथील सप्ताहाला जळगावकर ग्रामस्थांनी मोठी मदत करत हातभार लावल्याबद्दल कौतुकही केले.तसेच आगामी श्रीक्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी होत असलेल्या सप्ताहास सर्व गावांनी एकत्र येवून सहकार्य करण्याचे आवाहन महंत रामगिरीजी यांनी केले.सात दिवसीय कीर्तन महोत्सवाच्या दरम्यान ह.भ.प. सीमाताई मोरे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवार,ह.भ.प भारतीताई गाडेकर,ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री,ह.भ.प. माधव महाराज घोटेकर,ह.भ.प.अर्जुनगिरीजी महाराज,ह.भ.प. मधुसुधनगिरीजी महाराज आदींची कीर्तन सेवा पार पडली. दरम्यान या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दररोज होणाऱ्या काकडा भजन संगीत पारायण महोत्सवास हरिपाठ व कीर्तनास जळगाव-चौधरी वस्ती, वाकडी,धनगरवाडी चांगदेवनगर, गोंडेगाव, निमगावखैरी, येलमवाडी येथील भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.महंत रामगिरीजी महाराज पुढे म्हणाले की,संसारामध्ये बहुतांश वेळा स्वार्थासाठी प्रेम केले जाते. अनेकदा गरज म्हणून प्रेम असते, आणि काही ठिकाणी त्या प्रेमाचा केवळ देखावाही दिसून येतो. मात्र प्रेम हे नैसर्गिक असावे; कारण नैसर्गिक प्रेमामध्ये सहजता आणि प्रामाणिकपणा असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे उदाहरण देताना सांगितले की, जसे ब्राह्मणाचे सुगंधावर नैसर्गिक प्रेम असते, तसेच खरे प्रेम स्वाभाविक असते.तहान लागलेल्या मनुष्याला जसे पाण्यासाठी तीव्र व्याकुळता निर्माण होते, तसेच भक्तीमध्येही ओढ असावी. मीराबाई यांच्याबद्दल सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, मीराबाई भगवंताच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ झालेल्या होत्या.परमार्थामध्ये खरे प्रेम असते. आणि जेव्हा असे प्रेम निर्माण होते, तेव्हा आपोआप चिंतन घडते.देवाचा विसर पडू नये म्हणून आपण हातात माळ घेऊन जप करतो.त्यामुळे जिथे प्रेम असते, तिथेच खरे चिंतन असते.असे ते बोलताना म्हणाले.सप्ताहात व्यासपीठ चालक भगवान महाराज ठुबे, मुदंगाचार्य विजय महाराज चौधरी, महेश महाराज आदक, गायनाचार्य आदित्य महाराज आदमाने, वैभव महाराज भराडे, बाळासाहेब महाराज सांबारे हार्मोनियम डॉ. किरण बडाख, उत्तम महाराज शेटे, संजय महाराज चौधरी तसेच हरिपाठ व काकडा यशस्वी होण्यासाठी.

नारायण चौधरी, रवींद्र चौधरी, अण्णासाहेब मुळे, अनिल जोशी, बाबासाहेब चौधरी, ओम लोहकणे, लक्ष्मण औताडे, अशोक चौधरी, दत्तू चव्हाण, वेणुनाथ शिनगारे, विजय वाणी, जगन्नाथ चौधरी, बापूसाहेब चौधरी, राजेंद्र साळुंके, बाळासाहेब जाधव, शरद टिळेकर, अर्जुन माळी, अण्णासाहेब चौधरी, मच्छिंद्र चौधरी, किसन कदम, बापू आदमने, श्री. कुंदे, नारायण त्र्यंबक चौधरी, संजय चव्हाण, ज्ञानदेव वैद्य, कैलास जोशी, अनमोल कापरे, साई आदमने, राजेंद्र आदमने, डॉ. गणेश गायकवाड, प्रकाश पगारे, पोपट राशिनकर, भिकाजी आदमने, रमेश वाबळे, आदींचे सहकार्य लाभले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!