
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर – स्नेहालय रेडिओ नगर 90.4 FM तर्फे रेडिओ जॉकी (आर.जे.) बनण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनोख्या स्पर्धेतून तरुण-तरुणींना आपली निवेदनकला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
यासाठी स्पर्धकांना कोणत्याही सामाजिक विषयावर १०० शब्दांचे सादरीकरण सादर करायचे आहे. निवड झालेल्या स्पर्धकांना रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या रेकॉर्डिंगची संधी मिळणार आहे. निवेदन कौशल्य, आवाजातील स्पष्टता, आत्मविश्वास आणि सादरीकरण शैलीच्या आधारे विजेते निवडले जातील.
प्रथम क्रमांकासाठी रु. 1500 व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी रु. 1000, तर तृतीय क्रमांकासाठी रु. 500 बक्षीस दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.या स्पर्धेत विद्यार्थी व खुल्या गटातील इच्छुक स्पर्धक भाग घेऊ शकतात. कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची अट नाही आणि प्रवेश शुल्कही नाही.
स्पर्धकांनी आपले सादरीकरण 5 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावे.यासाठी ईमेल radionagar@snehalaya. org वेबसाईट: www.snehalaya.org वर भेट देवून संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून रेडिओ नगरने दिलेली ही संधी तुमच्या आवाजाला ओळख मिळवून देईल. आता रेडिओवर झळकण्याची तुमची वेळ आली आहे!
