
प्रतिनिधी:-वैभव ताजणे
संगमनेर-आश्वी.बु-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ दिंडोरी प्रणित आश्वी बु तालुक् संगमनेर येथी दि ९ ते १६ पर्यत गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे गुरूपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.दत्त जयंती निमित्याने गुरूचरित्र पारायण व यज्ञ याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यात ५० हून अधिक पुरूष व महिला सेवेकरी गुरूचरित्र पारायणात सहभागी झालेले आहेत.
श्री गुरूदेव दत्त नामाचा जयघोष करत पारायाणाची सुरूवात करण्यात आली. यात ग्रामदेवता सन्मान,मंडल मांडणी व आग्नी स्थापना करून स्थापित देवताचे हवन करण्यात आले.या पारायणात १०० हून अधिक महिला पुरूष सेवेकरी २४ तास पहारा देत आहे.यामध्ये माळ जप करणे, विना धारण करणे तसेच स्वामी चरित्र वाचण केले जाते.
‘गुरूचरित्र पारायण करणारी व्यक्ती ही खपु भाग्यवान असते. श्री.गुरूचरित्र पवित्र ग्रंथाचे ५२ अध्याय आहेत एकूण ७४९१ ओवी आहेत .त्याची विभागणी ज्ञागकाण्ड, कर्मकाण्ड,भक्तिकाण्ड यांचा संन्वययात साधला असुन या तीन ही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे यांचे वर्णन यामध्ये केले आहे.
