
अहिल्यानगर:सावळीविहीर-अहिल्यानगर रस्त्यांच्या झालेल्या अत्यंत दयनीय अवस्थेबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रश्नोत्तराच्या कालावधीत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर -अहिल्यानगर रस्त्याचे काम २ महिन्याच्या आत सुरू करावे सदरील रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सावळीविहीर -अहिल्यानगर रस्त्यावरुन देशाच्या विभिन्न भागातून अनेक भाविक ,पर्यटक प्रवास करतात तब्बल बारा वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत आहे या कारणास्तव या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत तसेच रस्त्याचे काम करणारे ठेकेदार ४० ते ५० टक्के बिलांचे काम घेत असल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जात नाही.याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे चर्चेदरम्यान नमूद करण्यात आले.नामदार नितीन गडकरी यांनी सांगितले की ते सावळीविहीर मार्गावरील रस्त्याच्या कामाबाबत केंद्र शासनाने दोन हजार पाचशे कोटी रकमेची तरतूद केली आहे रस्त्याच्या कामासंबंधीत तीन वेळ निविदा काढण्यात आल्या होत्या. यादरम्यान तीन ठेकेदार काम सोडून निघून गेले आहेत.
आताही रस्त्याचे काम करण्यासाठी दोन ठेकेदारांची नेमणूक केली होती परंतु; त्या दोन ठेकेदारांच्या मार्फत होणारे कामही रद्द करण्यात आलेले आहे आता १५ दिवसांची शॉर्ट नोटिस काढून दोन महिन्याच्या आत काम सुरू होई पर्यंत अहिल्यानगर- सावळीविहीर मार्गांवर तात्पुरती दुरुस्ती करण्यात येईल असा दिलासा मंत्री नितीनजी गडकरी यांनी लोकसभेत दिला.यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपप्रश्नात शहापूर ते गेवराई ह्या रस्त्याचे काम होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले तरी सदर रस्त्याचे काम हाती घेणेबाबत मंत्री नितीनजी गडकरी यांना विनंती केली आहे.
यानंतर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंत्री महोदय नितीन गडकरी यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन शहापूर –अकोले-संगमनेर-श्रीरामपूर-नेवासा-गेवराई महामार्ग, मतदार संघातील रस्ते त्याबाबतची दुरवस्था यामध्ये प्रामुख्याने १) घाटघर शेंडी राजूर अकोले संगमनेर लोणी श्रीरामपूर नेवासा रस्ता (रा.म.५० ) कि मी ३३/८०० ते ५९/९०० २) बारी- राजूर -जामगाव –कोतूळ-ब्राम्हणवाडा,-बोटा ते NH-६० रस्ता (रा.मा.-२३)किमी २३३/८७० ते २४८/२८० तालुका अकोले ३) NH-२२२ ते तोलारखिंड कोतूळ सावरकोल संगमनेर तळेगाव कोपरगाव उक्कलगाव (रा.म.६५) किमी २९/००० ते ३६/५०० तालुका अकोले ४) जिल्हा हद्द ते बारी राजूर कोतूळ ब्राह्मणवाडा बोटा रोड (रामा२३)कि मी २४९/५०० ते २६४/००० तालुका अकोले ५) शहापूर घोटी राजूर अकोले संगमनेर लोणी श्रीरामपूर नेवासा रोड (रामा -५०) कि मी ९३/००० ते ९८/९०० (चौपदरीकरण) तालुका संगमनेर (संगमनेर ते वडगाव फाटा) ६) पाथरे बु –लोणी- पिंप्रीनिर्मळ चोळकेवाडी- वाकडी चितळी रोड (MDR८६)किमी ७/५०० ते १३/५०० तालुका राहता (लोणी खुर्द मापरवाडी फाटा ते पिंप्री निर्मल) ७) कोल्हार बु (MDR २१ )राजुरी गोल्हारवाडी वाकडी पुणतांबा रस्ता (MDR८७)किमी ८/०० ते १७/०० तालुका राहता ८) MDR २१ ते हसनापुर लोणी आडगाव केलवड नांदुरखी ते रा.मा. ८ रस्ता (MDR १२६ ) किमी ०/०० ते ३४/४०० तालुका राहता ( भाग आडगाव ते केलवड) ९) श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव व मालेवाडी सरला रस्त्यावरील गोदावरी नदीवर मोठा पूल बांधणे १०) MDR २१ ते वळदगाव अशोकनगर ते टाकळीभान रस्ता (MDR ६) किमी ३/०० ते १७/५०० सदर रस्ते हे दळण-वळणाचे, भौगोलिक विकासाच्या दृष्टीने तातडीने होणे आवश्यक असल्याचे मा.मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देऊन सदर रस्त्यांचा समावेश केंद्रीय रस्ता निधी अंतर्गत करण्यात यावा याबाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना निवेदन देऊन सखोल विनिमय-चर्चा केली आहे.
सावळीविहीर -अहिल्यानगर रस्त्याचा प्रश्न थेट लोकसभेत रस्त्याचे काम लवकर सुरु करावे खा.वाकचौरे यांची केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना आग्रही मागणी.!!
