प्रशासकीयमहाराष्ट्र

ग्रामपंचायतीत गैरव्यवहार केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांची मोठी कारवाई शिबलापुर (ता.संगमनेर) ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद बोंद्रे यांचे सरपंच पद रद्द !!

कोव्हीड काळात ग्रामपंचायतीतून पदाचा दुरुपयोग करत ३० हजार ३८४ रूपये स्वत: च्या खात्यात वर्ग केल्याचा आरोप सिद्ध झाला असून सरपंच प्रमोद बोंद्रे यांचे सरपंच रद्द झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिनिधी- वैभव ताजणे

संगमनेर :-माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक तथा शिबलापुर (ता.संगमनेर) ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद सतिष बोंद्रे यांचे ‘ग्रामपंचायत सरपंच पदच अपात्र ठरविण्यात आले असून यांचबरोबर सरपंच प्रमोद सतिष बोंद्रे यांचे “ग्रामपंचायत सरपंच पदासह सदस्य पद देखील रद्द करण्यात आले आहे” अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

सविस्तर माहिती अशी की,प्रमोद सतिष बोंद्रे यांची शिबलापुर येथे साईराज मेडिकल नावे दुकान आहे. १४ व्या वित्त आयोगामध्ये खर्च झालेल्या रक्कमेत ग्रामपंचायतीचे सामान्य रोकड वही नमुना नं ५ मध्ये साईराज मेडीकल या दुकानातुन आरोग्य व शिक्षण लसीकरण साहित्य खरेदी करण्यात आले कोव्हीड २०१९ मध्ये एकूण ३० हजार ३८४ रूपयांची नोंद असुन याच कालावधित खाते उताऱ्यांमध्ये अ.क्र २२ वप दिनांक ३० मार्च २०२२ रोजी सदर रक्कम अदा झाल्याचे ही दिसुन आले.

गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी पत्र क्र /ग्राप/३८४/२०२४ ला दिल्येल्या प्रत्रामध्ये कळवले की विवादीत अर्ज हा पस्थित महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ग) अंतर्गत ग्रामपंचायत शिबलापुर येथील ग्रामपंचायतीचे ई ग्रामस्वराज ऑनलाईन ची पावती नुसार सरपंच प्रमोद बोंद्रे मौजे शिबलापुर येथे ग्रामपंचायत मार्फत साईराज मेडीकल च्या स्वत चे नावाने ३० हजार ३८४ रूपये (दि.३०) मार्च २०२२ रोजी स्विकारली आहे असे सिद्ध झाले चौकशी दरम्यान प्रथमदर्शी पुवाव्याने दिसुन आल्याचे निकालामध्ये नमुद करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४(१) (ग) व १६ मधील तरतूदीनुसार ग्रामपंचायत सदस्य तथा विद्यामान सरपंच प्रमोद सतिष बोंद्रे यांना अपात्र ठरविणे योग्य असल्याचे न्यायाधिश तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सांगितलेआहे.यावेळी तक्रारदारांच्या बाजूने अँड स्वप्निल काकड यांनी काम पाहिले..

==============================================================
“जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात हायकोर्टात अपिल करून शेवट पर्यत लढा देणार”..:-सरपंच प्रमोद सतिष बोंद्रे,शिबलापुर,ता.संगमनेर

‘कोव्हीड २०१९ च्या काळा मध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती असतांना सदभावपूर्वक लोक प्रतीनिधी असल्याने अत्यंत अल्पदरात लसीकरणासाठी आवश्यक असणारे साहित्य ग्रामपंचायती साठी ना नफा या तत्वावर पुरविले होते.औषध खरेदीसाठी सर्व कायदेशीर प्रकिया पार पाडला होता.कोव्हीड २०१९ ची परीस्थिती बघता नागरीकाच्यां हितासाठी औषधे व साहीत्ये खरेदी केले होते.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात हाय कोर्टात अपिल करून शेवट पर्यंत लढा देणार असल्याचे सरपंच बोंद्रे यांनी सांगितले आहे’..

==========================================================

“शिबलापुर गावचे ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंच प्रमोद बोंद्रे यांनी आपल्या काळात पदाचा दुर उपयोग केला”..:-अर्जदार दिपक निवृत्ती रक्टे,शिबलापुर ता-संगमनेर

‘शिबलापुर गावचे ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंच प्रमोद बोंद्रे यांनी आपल्या काळात पदाचा दुर उपयोग करत स्वता:च्या सहीने ३० हजार ३८४ रूपये स्वता:च्या खात्या मध्ये वर्ग केली. पदावार रहाता मोठा लाभ करून घेतला. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ग) अंतर्गत त्याचे पद रद्द करावे असा अर्ज करण्यात आला असल्याची माहिती अर्जदार निवृत्ती रक्टे यांनी दिली’…

==========================================================

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!