प्रवरा शिक्षण संस्थामहाराष्ट्र

लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील जयंती निमित्त दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना सहाय्यक साधने वाटप 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९३ व्या जयंती निमित्त डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगर अंतर्गत ४१ दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले. 

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ . पी एम गायकवाड , महासंचालक ( प्रशासकीय ) , डॉ . अभिजित दिवटे , संचालक , जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , अहिल्यानगर,डॉ. पडळकर , मुख्य प्रशासकीय अधिकारी , डॉ. दीपक अनाप,समन्वयक , जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व इतर अधिकारी उपस्थित होते.मा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून डॉ विखे पाटील फौंडेशन, अहिल्यानगर येथे सुरु झालेल्या प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अंतर्गत दररोज पात्र वयोवृद्ध ( ६० वर्षावरील ) व दिव्यांग व्यक्तींना सहायक साधनाचे वाटप करण्यात येणार आहे. 

 

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय , भारत सरकार यांच्या अंतर्गत सुरु झालेले हे भारतातील ७१ वे व महाराष्ट्रातील ४ थे केंद्र आहे. या केंद्रातील सुविधांचा फायदा घ्यावा असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील , अध्यक्ष , जिल्हा दिव्यांग पुनर्वन केंद्र यांनी केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!