महाराष्ट्र

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अक्षय मेमाणे याची कृषी सेवक पदी निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत असणाऱ्या प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील माजी विद्यार्थी अक्षय मेमाणे याने नुकत्याच झालेल्या कृषी विभाग,विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, कोल्हापूर विभाग, कृषी सेवक सरळ सेवा भरतीसाठी कृषी सेवक पदी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निलेश दळे यांनी दिली.

 

सदर भरतीसाठी २५० जागेसाठी सुमारे २०,००० पेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या यामध्ये अक्षय मेमाणे याची विटा खानापूर, सांगली येथे कृषी सेवक म्हणून निवड झाली आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध कृषी योजना अंबलबजावणी तसेच पीक सर्वेक्षण, शिवारभेटी,नुकसान पंचनामा व अहवाल सादरीकरणाची जबाबदारी या सेवेतून पार पाडणार आहे.

 

अक्षय मेमाणेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे तसेच कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी अभिनंदन केले आहे. 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!