
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने, सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच ह.भ.प. विजय महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील जळगाव येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, संत तुकाराम महाराज गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दिनांक २१ ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होईल.
या सप्ताहादरम्यान दररोज विविध कीर्तनसेवा आयोजित करण्यात आल्या असून, दि.२१ एप्रिल रोजी रात्री साडेसहा वाजता ह.भ.प. सीमाताई मोरे (माळीवाडगावकर) यांचे कीर्तन होईल. दि.२२ एप्रिल रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवार (आळंदी देवाची) यांचे कीर्तन संपन्न होईल. दि.२३ एप्रिल रोजी ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री यांचे कीर्तन होईल, तर दि. २४ एप्रिल रोजी ह.भ.प. भारतीताई गाडेकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.तसेच दि.२५ एप्रिल रोजी ह.भ.प. माधव महाराज घोटेकर यांचे कीर्तन, दि.२६ एप्रिल रोजी ह.भ.प. अर्जुनगिरीजी महाराज यांची कीर्तन सेवा, आणि दि.२७ एप्रिल रोजी ह.भ.प. मधुसुधनगिरीजी महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
मंगळवार, दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता संत तुकाराम महाराज गाथा मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी ६ वाजता सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल.जळगाव- चितळी-चौधरी वस्ती, वाकडी,धनगरवाडी चांगदेवनगर, गोंडेगाव, निमगावखैरी, येलमवाडी येथील भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभणार आहे.काला महाप्रसाद सेवेसाठी समस्त जळगावकर ग्रामस्थांचे सहकार्य लाभेल.दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, सकाळी ७ ते १२ या वेळेत संगीत गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, तसेच रात्री साडेसहा ते साडेआठ या वेळेत कीर्तन आयोजित करण्यात येणार आहे.सप्ताह कालावधीत दररोज भाविकांसाठी अन्नदान सेवा ठेवण्यात येणार आहे.या धार्मिक सप्ताहाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा,असे आवाहन सप्ताह कमिटी तसेच युवासेवकांकडून करण्यात आले आहे.




