महाराष्ट्रशैक्षणिक

जळगाव जिल्हा परिषद शाळेचे दैदीप्यमान यश! २९ विद्यार्थी राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत चमकले

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल २९ विद्यार्थ्यांनी लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक नारायण जाधव यांनी दिली.

राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ (दि.१५) फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती.नुकताच एप्रिल महिन्यात निकाल जाहीर झाला असून उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आरुषी देशमुख, गुंजन चौधरी, अदिती चौधरी, स्वरा आदमाने, पायल आदमाने, वर्षा सिन्नरकर, प्रियल लोहकरे, सेजल गुंड, समृद्धी साळुंखे, प्रणया चौधरी, धनश्री चौधरी, ओवी चौधरी यांचा समावेश आहे.तसेच अर्जुन गायकवाड, उदय शेलार, प्रथमेश चौधरी, अब्दुलमलिक शेख, जयराज चौधरी, रुद्र कापरे, तन्मय गुंड, श्रेयस चौधरी, विधान पंडित, अब्दुल्ला शेख, अर्णव आदमाने, अरीश शेख, राजवीर आदमाने, रुद्र आदमाने, देवांश देशमुख, देवांश आदमाने हुजेफ शेख यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

 

या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रमपूर्वक अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जळगावचे नाव जिल्हा व केंद्रस्तरावर झळकले आहे.शाळेचे मुख्याध्यापक नारायण जाधव, ठकाजी खेमनर, मारुती खरात, मंगल भडांगे आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असून पंचक्रोशीत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या यशाबद्दल जळगाव ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, माजी विद्यार्थी संघ, शिक्षणप्रेमी नागरिक, माता-पालक संघ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!