
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदीर आणि कनिष्ठ महाविद्यालय दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून ही परंपरा कायम असल्याची माहीती प्राचार्या सौ. भारती कुमकर यांनी दिली.
यामध्ये कु ज्ञानेश्वरी सखाराम भोसले ९७.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक, कु. दिपाली सुरेश धावणे आणि कु. गौरी राहुल दातीर ९४.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. मानसी चंद्रशेखर डेंगळे ९४ टक्के मिळवून तृतीय आल्या आहेत..बोर्डाच्या परीक्षेस एकूण २६४ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या .त्या पैकी ११० विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून १०८ विद्यार्थिनी या प्रथम श्रेणीत आहेत.
यशस्वी विद्यार्थिनींचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,डाॅ.राजेंद्र विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद हिरेमठ, संस्थेचे अतांत्रिकचे संचालक डॉ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्राचार्या सौ.भारती कुमकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
