अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

भाजपा शहर उपाध्यक्षपदी प्रमोद कुऱ्हे; श्रीरामपूर व गोंधवणी परिसरातून नियुक्तीचे स्वागत

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान; मित्रपरिवाराकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी-गोपाल शिंदे 

 

श्रीरामपूर – भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहराच्या उपाध्यक्षपदी प्रमोद कुऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे कार्यकर्ते म्हणून प्रमोद कुऱ्हे यांची ओळख आहे. श्रीरामपूर शहर, तालुका तसेच गोंधवणी परिसरात भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी सातत्याने प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी संघटन वाढीसाठी योगदान दिले आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाची ना. राधाकृष्ण विखे पाटलांनी दखल घेतली असून त्यांच्यावर भाजपच्या श्रीरामपूर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रमोद कुऱ्हे यांच्या निवडीचे श्रीरामपूर व गोंधवणी परिसरातील मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीरामपूर नगरपरिषदेचे कार्यरत नगरसेवक बिट्टू भाऊ कक्कड, श्रीराम फायनान्स कोपरगाव शाखेचे ब्रांच मॅनेजर गोपाल शिंदे तसेच श्रीराम फायनान्स श्रीरामपूर शाखेचे ब्रांच मॅनेजर सागर ढोकचौळे यांनी प्रमोद कुऱ्हे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रमोद कुऱ्हे यांच्यावर सोपविण्यात आलेली शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास मित्रपरिवाराकडून व्यक्त करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल श्रीरामपूर व गोंधवणी परिसरातील नागरिक, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!