अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

प्रवरा परिसरातील महात्मा गांधी संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

गांधी-शास्त्री विचारांचा जागर; विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

प्रतिनिधी-शंकर सोनवने

 

लोणी – रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरा परिसरातील महात्मा गांधी संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संकुलाचे प्राचार्य दिलीप डहाळे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, पर्यवेक्षिका संगीता सांगळे तसेच शिक्षकांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संगीता उगले यांनी केले. यावेळी डॉ. शरद दुधाट व प्राचार्य दिलीप डहाळे यांनी मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांसह लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावा, असे आवाहन करण्यात आले.

प्राचार्य दिलीप डहाळे यांनी आपल्या मनोगतात दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास प्र. उपप्राचार्य संजय डुबे, शिवाजी काळे, संजय ठाकरे, देवेश आहेर, माधुरी वडघुले, रविंद्र मेढे, विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता उगले यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी नरेंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर तिन्ही विभागांतील विद्यार्थ्यांनी मैदान व विद्यालय परिसरात श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. स्वच्छता, जलसंवर्धन आणि राष्ट्रसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!