
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, चितळी शाखेच्या वतीने बहुजन टायगर फोर्सचे संस्थापक संजय रूपटक्के यांचा सन्मान करण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या समावेशक विचारांचा आदर्श घेत समाजसेवा करणाऱ्या विविध व्यक्तिमत्त्वांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे यांच्या हस्ते, आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत श्रीरामपूर येथील बहुजन टायगर फोर्सचे संस्थापक संजय रूपटक्के यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपजिल्हाध्यक्ष योगेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून समाजसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात येतो. जनसेवेसाठी अखंड झटणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा उपक्रमांद्वारे प्रोत्साहन देत त्यांना कौतुकाची थाप दिली जाते.
या कार्यक्रमास आरपीआय चितळी शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये योगेश भाऊ बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य रुपेश भाऊ गायकवाड, भीमराव कदम, कमलेश वाडेकर, फकीरा गायकवाड, अंबादास गायकवाड, विशाल भाऊ बनसोडे, दिवे सर, प्रशांत साबळे, शैलेश खरात, संजय मगर, रवी भाऊ थोरात आदी मान्यवरांचा समावेश होता.




