कोपरगावमहाराष्ट्र

कोपरगावात आ.विवेकभैय्या कोल्हे यांचा २ मे रोजी भव्य ऐतिहासिक स्वागत सोहळा 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव-भारतीय जनता पार्टीकडून आमदार विवेकभैय्या बिपिन दादा कोल्हे यांची नुकतीच विधान परिषद सदस्यपदी निवड झाली असून, या निवडीचे संपूर्ण महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. या निवडीच्या निमित्ताने कोपरगाव शहरात भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, कोपरगाव नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार विवेकभैय्या कोल्हे यांना शुभेच्छा देण्यासाठी कोपरगाव येथील साई कॉर्नर परिसरात शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. असून साईबाबा कॉर्नर – अण्णाभाऊ साठे स्मारक- बस स्टॅन्ड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत रॅली काढली जाणार आहे  या कार्यक्रमास समस्त कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन,भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या क्षणाची कार्यकर्त्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून उत्सुकता होती. आमदारकी जाहीर झाल्यानंतर कोपरगावसह परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या भेटीगाठी घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.या कार्यक्रमासाठी कोपरगाव तसेच परिसरातील सर्व तालुक्यांतील भाजपा कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!