कोपरगाव तालुकामहाराष्ट्रसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण ही काळाची गरज- विवेकभैय्या कोल्हे

कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव शहर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीयांना सर्वधर्मसमभावाचा अधिकार दिल्यामुळे देशात शांतता, सलोखा आणि प्रगतीचा मार्ग कायम राहिला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण करणे आवश्यक आहे,ती काळाची गरज आहे असे प्रतिपादन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.

कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.या प्रसंगी सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नूतन इमारतीत कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने १० तासांचे स्टडी मॅरेथॉन सत्र आणि भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन युवानेते विवेकभैय्या कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आणि शिक्षण सभापती संजनाताई संजय उदावंत यांच्या हस्ते पार पडले.यावेळी जि.प. प्राथमिक शाळा, मुर्शतपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान हस्तलिखित प्रत लेखन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.ग्रंथ प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी संवाद साधत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी नगरध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गट नेते प्रसाद आढाव,डी.आर काले, दिलीप दारूणकर,रवींद्रअण्णा पाठक, राजेंद्र सोनवणे,संजय उदावंत,अमोल अजमेरे,संतोष शिंदे, दत्तात्रय पगारे, विक्रमादित्य सातभाई, योगेश बागुल,फिरोज पठाण,स्वप्नील मंजुळ,संदीप देवकर,अतुलशेठ काले,विनोद राक्षे, रवींद्र कथले,वैभव गिरमे, अविनाश पाठक.

मयूर गायकवाड,सोमनाथ म्हस्के,दीपक जपे, राहुल खरात,गोपीनाथ गायकवाड, रवींद्र रोहमारे,सतीश रानोडे, प्रदीप नवले,सलीम पठाण, जयप्रकाश आव्हाड, संतोष गंगवाल,सुशांत खैरे,नसिरभाई सय्यद,फकीर मोहम्मद पहिलवान, कालविंदर सिंग डडीयाल,निसार शेख,मुकुंद उदावंत,शामभाऊ अहेर,सुनील कुंढारे,संतोष साबळे, रोहित कनगरे,बाळासाहेब सोनटक्के,खालिक कुरेशी,इरफान कुरेशी, योगेश नरोडे, राजेंद्र गायकवाड, धनंजय आढाव, संतोष शेजवळ, नाना भुजबळ,राकेशजी काले,आशिष निकुंभ,संतोष चवंडके,प्रतीक पगारे,अभिषेक मंजुळ, प्रभूदास पाखरे,संदीप वाकचौरे,प्रतीक पाठक, महेश दुशिंग, जितेंद्र दिवेकर, संपत चंदनशिव, बाळासाहेब पवार,रिंकेश नरोडे, ज्ञानेश्वर गोसावी,कैलास खैरे, सोमनाथ रोठे, निखील सांगळे, फकीरा चंदनशिव,शैलेश नागरे आदींसह कोपरगाव शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!