प्रशासकीयमहाराष्ट्र

वसुली केलेला पैसा श्रीरामपूर नगरपालिका फंडात येत नाही तोपर्यंत शुक्रवार बाजारात वसुली होऊ देणार नाही – नगरसेवक आकाश बेग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर -शहरात भरणाऱ्या आठवडे बाजाराबाबत पालिकेचे अधिकारीच अंधारात आहेत.डेली वसुलीच्या नावाखाली शुक्रवारच्या बाजारातील शेतकरी, व्यापाऱ्यांकडून वसूल केलेला पैसा पालिकेच्या फंडात जमा होतो पण शहरात इतरत्र भरणाऱ्या बाजारात वसूल केलेली रक्कम कुठे जाते..?या शिवसेनेचे नगरसेवक आकाश बेग यांच्या प्रश्नावर सभेचे वातावरण चांगलेच तापले होते.* 

              पालिकेची सर्वसाधारण सभा काल पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत चांगलीच रंगात संपन्न झाली.सभागृहात येताच विरोधी नगरसेवकांना बसायला कुठे जागा देणार म्हणून नगराध्यक्षांना विरोधी नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले.शिवसेना नगरसेवक आकाश बेग,भाजपाचे नगरसेवक श्रीनिवास बिहानी ,दिपक चव्हाण,वैशाली चव्हाण,यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरल्याने काहीकाळ दोन्ही बाजूंचे आवाज वाढले होते.नगरसेवक आकाश बेग यांनी आठवडे बाजार शहरात किती ठिकाणी भरतात या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले का त्यांनी न सांगण्याचे सोंग घेतले हे समजले नसले तरी एका अधिकाऱ्याने शहरात एक बाजार भरतो असे मोघम दिलेल्या उत्तरावर चांगलीच खडाजंगी झाली. त्यावर आकाश बेग म्हणाले की,शहरात इतरत्र देखील मोठ्याप्रमाणात बाजार भरतो शेतकरी,व्यापारी त्याठिकाणी आपला भाजीपाला विकण्यास घेऊन येतात.या मुद्द्यावर नगरसेवक आकाश बेग यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत डेली वसुलीचा मुद्दा सभेत चांगलाच गाजवला हिंदू बहुल भागातील शुक्रवार बाजारात डेली वसुली जोमात केली जाते पण इतरत्र भरणाऱ्या बाजारात वसुली होते पण पैसे पालिकेकडे जमाच होत नसल्याने आता येथून पुढे शुक्रवारच्या बाजारात व्यापाऱ्यांकडून डेली वसुली केल्यास त्यास आम्ही कडाडून विरोध करू असा पावित्रा आकाश बेग यांनी घेतला त्यास विरोधी नगरसेवकांनी पाठींबा दर्शविला. प्रभाग क्रमांक बारा मधील काशीविश्वेश्वर या रस्त्याचे काम मंजूर होऊनही ठेकेदाराने कामास अद्याप पर्यंत का सुरुवात केली नाही त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायची मागणी याप्रसंगी आकाश बेग यांनी केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!