महाराष्ट्रसामाजिक

गणेश परिसराच्या जडणघडणीत सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे साहेबांचे मोलाचे योगदान – गंगाधर चौधरी

सहकार महर्षी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त जळगावात अभिवादन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – माजी मंत्री सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे साहेबांचे नेतृत्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे होते.त्यांनी शैक्षणिक संस्था उभारून शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.गणेश परिसराच्या उन्नतीसाठी सातत्याने लढा देत परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक पावले उचलून शासनाच्या विरोधात विविध मोर्चे काढून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.सर्वसामान्य शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल करण्यात आणि गणेश परिसराच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी यांनी केले.

 

 

राहाता तालुक्यातील जळगाव येथे (दि. २४ मार्च) सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेबांची जयंती प्रेरणा दिन म्हणुन साजरी करण्यात आली.यावेळी जळगाव परिसरातील समस्त नागरिकांनी सहकार महर्षी स्व.कोल्हे साहेबांच्या प्रेरणादिनानिमित्त प्रतिमेस पुष्प अर्पण करून पूजन केले. त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शेतकरी हितासाठी तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला.

 

 

या प्रसंगी ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी, सुरेश चौधरी, मच्छिंद्र चौधरी, रंगनाथ चौधरी, अप्पासाहेब चौधरी, एकनाथ निर्मळ, बाबासाहेब पंडित, राजेंद्र चौधरी, दिलीप चौधरी, महेंद्र चौधरी, सुधाकर चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय चौधरी, बाळासाहेब चौधरी, प्रवीण चौधरी, जितेंद्र चौधरी, बापूसाहेब चौधरी आदींसह जळगाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!