प्रशासकीयमहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक एक मधील लक्ष्मीनारायणनगर आणि गुरुनानक नगर पाणीसमस्येला कायमचा दिलासा; नगरसेविका व नगरसेवक यांच्या पुढाकारातून पाईपलाईनचे काम सुरू

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी -गोपाल शिंदे

 

श्रीरामपूर – नगरपालिकेच्या नगरसेविका व नगरसेवक यांच्या पुढाकारातून लक्ष्मीनारायणनगर आणि गुरुनानक नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत होते.या पाणीसमस्येची दखल घेत नगरपालिकेच्या माध्यमातून आज सकाळी तात्काळ जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. 

 

 

या कामामुळे लक्ष्मीनारायणनगर व गुरुनानक नगर परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना होणारी पाण्याची अडचण आता सुटणार आहे.नगरसेविका व नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई करत हे काम सुरू केले आहे.पाईपलाईनचे काम वेगाने सुरू असून लवकरच परिसरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच स्थानिक नागरिकांनी नगरसेवक व नगरसेविका यांनी केलेल्या कामाचे स्वागत केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!