प्रशासकीयमहाराष्ट्रराजकीय

सर्वसामान्य जनतेच्या मनात मोलाचे स्थान निर्माण करणारा लोकनेता हरपला-मा.आ. स्नेहलताताई कोल्हे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.ते आज आपल्यात नाही.याचे दुःख आहे.अभ्यासू दूरदृष्टी असणारे त्यांचे नेतृत्व होते.संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या जाण्याने खूप दुःख झाले असून.सर्वसामान्य जनतेच्या मनात मोलाचे स्थान निर्माण करणारा लोकनेता आज हरपला असल्याचे प्रतिपादन कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी केले.

 

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे बारामती येथे सकाळी 9 वाजेच्या सुमारास चार्टड विमान अपघातात दुःखद निधन झाले,त्यांच्या अकाली निधनाबाबत कोपरगावच्या मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना प्रतिक्रिया दिली.

 

 

त्या म्हणाल्या,दिवंगत शंकरराव कोल्हे साहेबांचे पवार साहेबांचे ऋणानुबंध होते.कोल्हे व पवार कुटुंबीयाचे राजकीय नाते काहीही असो परंतु कधी एकमेकांवर व्यक्तिगत टीका केलेली नाही.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला खूप मोठी हानी झाली आहे.स्व.अजितदादा आज आपल्यात नाही हे कधी न भरून निघणारे नुकसान असून ते अतिशय दूरदृष्टी असणारे नेतृत्व होते.महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोठा हातभार लावला होता.राजकीय जीवनात शिस्तीचे उत्तम पालन करत होते. वळेचे खुप पक्के होते.त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती.अजित दादा पवार साहेबांचा सहकार बँकिंग शेती क्षेत्र आदी क्षेत्रांवर अतिशय सखोल अभ्यास होता.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडणारा नेता म्हणून अजितदादा पवार हे प्रचलित होते.सकाळी सहा साडेसहा वाजता अजितदादा पवार यांच्या कामाची सुरुवात होणार होती.वेळेचे बंधन पाळणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जात होते. निश्चितच अजितदादा गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

 

उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी येसगाव येथील निवासस्थानी भेट दिली होती. ती भेट मी कधीही विसरू शकत नाही.दादांना स्वच्छतेची वृक्षाची जास्त आवड होती.यासोबत पर्यावरणाचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता.निवास्थानी असलेल्या वडाच्या वृक्षांचे त्यांनी कौतुक केले.समस्त कोल्हे कुटुंबियासोबत गप्पागोष्टी करत त्यांनी जवळपास पाऊण तास आमच्या सर्वांशी विविध विषयांवर चर्चा केली.आपला जवळचा माणूस म्हणून अजित दादा पवार हे परिचित होते.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने कोल्हे परिवाराला अत्यंत दुःख झालेले आहे.

 

 

युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांची (दि. 27) जानेवारी रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री कार्यालयात उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची भेट झाली यावेळी दादांनी विवेक भैय्यांसोबत आपुलकीने संवाद साधला. कारखाने कसे चालू आहेत क्रशिंग कशी चालू आहेत याबाबत आपुलकीने विचारणा केली. यामुळे युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांना देखील मोठं दुःख झाले आहे.आज अजित दादा पवार आपल्यामध्ये नाहीत यावर अजूनही विश्वास ठेवणं कठीण आहे.असं जाणं एखाद्या लोकनेत्याने भेटणं तसेच अचानकच दुःखद निधन होणं ही अतिशय वाईट घटना आहे.यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला.कोल्हे परिवाराच्या तसेच संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!